• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • नाका-तोंडात गेलं होतं पाणी; कार लॉकने घेतलं ईश्वरी-शुभमचं प्राण

नाका-तोंडात गेलं होतं पाणी; कार लॉकने घेतलं ईश्वरी-शुभमचं प्राण

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा बॉयफ्रेंड शुभम देगडे यांचा गोव्याजवळ बागा-कलंगुट येथे अपघाती निधन झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- मराठमोळी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे(Iswari Deshpande) आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या अपघाती निधनाने (Accidental Death) सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वेळ कधीही सांगून येत नाही असं म्हटलं जात असच काहीसं घडलं ईश्वरी आणि शुभमसोबत. अगदी आनंदाने एकमेकांसोबत गोव्याकडे जाणाऱ्या या जोडप्यावर अचानक काळाने घाला घातला. या दोघांचाही मृत्यू गुदमरल्यानं झाल्याचं म्हटलं जात आहे. पाहूया या दोघांसोबत नेमकं काय घडलं.
  अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा बॉयफ्रेंड शुभम देगडे यांचा गोव्याजवळ बागा-कलंगुट येथे अपघाती निधन झालं आहे. हे दोघेही बागा येथील वाहतूकीस अरुंद असणाऱ्या रस्त्यावरून जात होते. सुमारे पहाटे पाच्छि वेळ असल्याचं म्हटलं जात आहे. पाहटे हे लोक या रस्त्यावरून प्रवास करत असताना चालकाचा करवरील ताबा सुटला. आणि त्यांची कार रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या खाडीमध्ये जाऊन पडली. यावेळी त्यांच्या कारचा दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे त्यांना बाहेर पडणं शक्य झालं नसेल त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेलं. आणि त्यामुळेच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं आहे. (हे वाचा:एका चुकीने घेतला ईश्वरी आणि शुभमचा जीव; पुढच्या महिन्यात होता साखरपुडा) पोलीस निरिक्षक सुनील गवस यांनी याबद्दलची माहिती माध्यमांना दिली होती. गवस यांनी इंडियन एक्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होत, 'वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. ताबा सुटल्याने कार खाडीमध्ये कोसळली होती. अग्निशमन दलाच्या सहाय्याने या दोघांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं होतं. ईश्वराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही मालिकांचा समावेश आहे. (हे वाचा:पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू; गाडीवरील नियंत्रण .. ) अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि शुभम अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. तसेच हे दोघे पुढच्या महिन्यात आपला साखरपुडा करणार होते.असं म्हटलं जात आहे. नव्या आयुष्याची स्वप्न रंगवत असलेल्या या जोडप्यावर अचानक काळाने घाला घातल्याने सर्वच लोक सुन्न झाले आहेत. ईश्वरीने अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिने आपल्या आगामी एक हिंदी एक मराठी चित्रपट आणि एका मालिकेचंदेखील शूटिंग पूर्ण केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published: