• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • एका चुकीने घेतला ईश्वरी आणि शुभमचा जीव; पुढच्या महिन्यात होता साखरपुडा?

एका चुकीने घेतला ईश्वरी आणि शुभमचा जीव; पुढच्या महिन्यात होता साखरपुडा?

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि शुभम देगडे यांच्यावर असा अचानक काळाने घाला घातल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22सप्टेंबर- 20 सप्टेंबर रोजी सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना घडली आहे. अभिनेत्री ईश्वरी देशपांडे(Ishwari Deshpande) आणि तिचा बॉयफ्रेंड शुभम देगडे (Shubham Degade) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गोव्यातील बागा-कालंगुट खाडीत त्यांची कार कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात(Accidental Death) घडला आहे. दरम्यान असं म्हटलं जात आहे, ईश्वरी आणि शुभम हे पुढच्या महिन्यात साखरपुडा करणार होते.
  अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि शुभम देगडे यांच्यावर असा अचानक काळाने घाला घातल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला होता. गोवा येथील बागा रस्त्यावरून जात असताना अरुंद रस्त्यामुळे शुभमचा आपल्या कारवरील ताबा सुटला आणि त्यांची कार खाडीत कोसळली. कारचा दरवाजाही लॉक झाला होता. त्यामुळे त्या दोघांना बाहेर पडता आलं नाही. त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला आहे. (हे वाचा:पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू; गाडीवरील नियंत्रण ... ) पोलीस निरिक्षक सुनील गवस यांनी याबद्दलची माहिती माध्यमांना दिली होती. गवस यांनी इंडियन एक्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होत, 'वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. ताबा सुटल्याने कार खाडीमध्ये कोसळली होती. अग्निशमन दलाच्या सहाय्याने या दोघांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं होतं. ईश्वराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये हिंदी आणि मराठी दोन्ही मालिकांचा समावेश आहे. (हे वाचा:विद्याधर करमरकर यांचं निधन; मोती साबणाच्या 'अलार्म काकां'नी ठसवली होती ओळख) पुढच्या महिन्यात होता साखरपुडा- अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि शुभम अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सध्या अशा चर्चा सुरु आहेत की हे दोघे पुढे लग्न तर करणारच होते मात्र पुढच्याच महिन्यात आपला साखरपुडा करणार होते. मात्र त्यांच्या अशा अचानक मृत्यूने सर्वच लोक सुन्न झाले आहेत. अभिनेत्री ईश्वरी देशपांडेच्या अशा अचानक अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वरीने एका मालिकेसाठी शूटिंग केल्याचंही म्हटलं जात आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: