मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नवऱ्याने बेसन लाडू भरवला आणि वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

नवऱ्याने बेसन लाडू भरवला आणि वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशीच प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

इश्कबाज' आणि 'कुबूल है' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री निशी सिंग भाडलीचं रविवारी निधन झालं आहे. निशी सिंगच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 18 सप्टेंबर : 'इश्कबाज' आणि 'कुबूल है' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री निशी सिंह भाडलीचं रविवारी निधन झालं आहे. निशी सिंहच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या जाण्याने कुटुंब, मित्र परिवार सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

गेल्या चार वर्षापासून निशी सिंह अर्धांगवायूची शिकार होती. टाईम्सच्या मुलाखतीनुसार, निशीचा पती लेखक-अभिनेता संजय भादली यांनी सांगितले की, निशी चार वर्षांपासून आजारी होती. 13 फेब्रुवारी 2019 रोजी तिला अर्धांगवायूचा पहिला झटका आला. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा झटका आला. त्यानंतर 24 मे 2022 रोजी पुन्हा तिसऱ्यांदा झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ती सतत रुग्णालयात दाखल होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसांपूर्वीच निशीने तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता. 16 सप्टेंबर रोजी ती 50 वर्षांची झाली होती. दुःखाची बातमी की आता आपल्यात नाही.

हेही वाचा -  फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; आज आहे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री

यावेळी संजय सिंह यांनी पत्नी निशीची शेवटची इच्छाही सांगितली. घशाच्या संसर्गामुळे ती काही दिवसांपासून अन्नात फक्त द्रव घेत होती. तिने वाढदिवसादिवशी तिचा आवडता बेसन लाडूही खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिने बेसन लाडू खाल्लाही.

दरम्यान,  निशीने केवळ 8 वर्षे इंडस्ट्रीत काम केले. मान्सून वेडिंग या चित्रपटात तिने काम केले होते. त्यानंतर कमल हसन आणि मामूटीचा चित्रपट केला. मुंबईत आल्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.

First published:

Tags: Social media, Tv actress, Tv serial