S M L
Football World Cup 2018

इशानला जान्हवीचं 'याडं लागलं'!

चोरी चोरी चुपके चुपके 'धडक'च्या सेटवर रिअल लव्हस्टोरी फुलू लागली आहे.इशान आणि जान्हवी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.विशेषतः इशान आपल्या लेडी लव्ह जान्हवीला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो.

Sonali Deshpande | Updated On: Jan 12, 2018 04:49 PM IST

इशानला जान्हवीचं 'याडं लागलं'!

12 जानेवारी : मराठीतील सुपरडुपर हिट सिनेमा 'सैराट'.'झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं.सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या.त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले.रसिकांप्रमाणेच सैराटची भुरळ बॉलिवूडलाही पडली.त्यामुळे बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा रिमेक बनवण्याचं ठरवलं.सध्या बॉलिवूडमध्ये सैराटचा रिमेक 'धडक'ची जोरदार चर्चा सुरु आहे.केजो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.या सिनेमात शाहीद कपूरचा धाकटा भाऊ इशान खट्टर आणि श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.इशान परश्या तर जान्हवी आर्ची बनून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर.असंच काहीसं बॉलिवूडच्या या रिल परश्या आणि आर्चीमध्ये घडत आहे.

चोरी चोरी चुपके चुपके 'धडक'च्या सेटवर रिअल लव्हस्टोरी फुलू लागली आहे.इशान आणि जान्हवी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.विशेषतः इशान आपल्या लेडी लव्ह जान्हवीला खुश ठेवण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो.जान्हवी सरप्राईजेस देणे हा जणू इशानचा छंदच बनला आहे.सकाळ संध्याकाळ इशान जान्हवीसाठी विविध गिफ्ट घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे.काही दिवसांपूर्वी तर इशानने आपल्या प्रेमासाठी म्हणजेच जान्हवीसाठी खास अमेरिकेहून विशेष गिफ्ट मागवलं होतं.हे गिफ्ट पाहून जान्हवीच्या आनंदाला पारावार उरला नाही.त्यामुळे जान्हवीसुद्धा इशानवर लट्टू झाल्याचे बोललं जात आहे.

दुसरीकडे जान्हवीचं नाव तिचा कथित बॉयफ्रेंड अक्षत राजनशीही जोडलं गेलं.गेल्या वर्षी नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.या व्हिडीओत अक्षतसह जान्हवी गाण्याच्या तालावर बेधुंद होऊन थिरकत असल्याचे पाहायला मिळालं होतं.त्यावेळी जान्हवीला आईकडून वॉर्निंगही मिळाली होती.याशिवाय एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यांत जान्हवी,अक्षत,बोनी कपूर आणि श्रीदेवी पाहायला मिळत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 04:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close