जान्हवी कपूर-ईशानच्या हाॅट फोटोमुळे एकच खळबळ

जान्हवी कपूर-ईशानच्या हाॅट फोटोमुळे एकच खळबळ

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी 'धडक'मधून सिनेमात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमापासून दोघांमध्ये खास बंध जाणवत होते.

  • Share this:

मुंबई, 04 आॅक्टोबर : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी 'धडक'मधून सिनेमात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमापासून दोघांमध्ये खास बंध जाणवत होते. सैराटचा हा रिमेक मराठी लोकांना फारसा आवडला नसला तरी हिंदीमध्ये लोकप्रिय झाला. सध्या दोघांच्या हाॅट फोटोनं एकच खळबळ माजलीय.

हाॅट लूकमधली जान्हवी कपूर काळ्या स्लिपमध्ये आहे. तिनं जरा मोठंच जॅकेट घातलंय. ईशान तिच्या मांडीवर झोपलाय आणि फोटोसाठी पोज देतोय. ईशाननंच हा फोटो इन्स्ट्राग्रामवर टाकलाय.

बॉलिवूड अभिनेत्री आणि जान्हवीची आई श्रीदेवी यांना जान्हवीच्या धडक सिनेमाबाबत खूपच उत्सुक होती.  त्यासाठी जान्हवीकडून तयारी सुद्धा करून घेत होत्या, खरं तर जान्हवीने सिनेसृष्टीत करियर बनवू नये असं श्रीदेवींचं सुरुवातीला मत होतं. परंतु  जान्हवीने बॉलिवूड हे ऑप्शन निवडलं तेव्हा श्रीदेवींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यासाठी ब्युटी टिप्सपासून अभिनयातील नजाकतींची सुद्धा तयारी तिच्याकडून करून घेतली.

धडकच्या शूटिंगच्या सुरुवातीला अनेकदा श्रीदेवी तिच्या सोबत शूटवर जायच्या आणि घरच्या फावल्या वेळात तिच्याकडून अभिनयाचे धडे गिरवून घ्यायच्या. जान्हवीचं बॉलिवूडमधील पदार्पण आणि धडकचं बॉक्स ऑफिसवरील यश पाहण्यासाठी त्या खूप उत्सुक होत्या. परंतु नियतीच्या मनात वेगळंच होतं.

जान्हवी कपूर करण जोहरच्या तख्त सिनेमात दिसणार आहे. ही मुघल काळातली कथा आहे. त्यात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर अशी मोठी स्टारकास्ट आहे.  यात औरंगजेबाचीही व्यक्तिरेखा आहे. आणि ती रणवीर सिंगच करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रणवीरचा खलनायक पाहायला मिळणार आहे. प्रेमासाठी झालेलं युद्ध म्हणजे तख्त असं करणनं म्हटलंय.

मुकेश अंबानी सलग ११ व्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा टॉप १० लिस्ट

First published: October 4, 2018, 5:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading