आता मायावतींवरही बायोपिक, मुख्य भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

आता मायावतींवरही बायोपिक, मुख्य भूमिकेसाठी 'या' अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांचाही बायोपिक बनवला जाणार असून 'जॉली एलएलबी' सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : बॉलिवूडमध्ये सध्या बॉयोपिकचा ट्रेंड आहे. पण त्यातकरुन सध्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर एकामागोमाग एक बायोपिक येत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकनंतर तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकचीही घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आणि आता या यादीत आणखी एका राजकीय व्यक्तिमत्वाची भर पडणार आहे.

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार आता बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांचाही बायोपिक बनवला जाणार असून 'जॉली एलएलबी' सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूर या बायोपिकचे दिग्दर्शन करणार असल्याचं समजतं. या सिनेमासाठी अनेक अभिनेत्रीची नावं घेतली जात होती मात्र आता या सिनेमातील मायावतींची मुख्य भूमिका अभिनेत्री विद्या बालन साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र विद्यानं अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

विद्या बालनकडे सध्या 'एनटीआर' या एन. टी. रामराव यांच्या जीवनावर आधारित तेलुगु बायोपिक मध्ये काम करत असून यात ती एनटीआर यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वेब सीरीजमध्येही दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत या वेब सीरीजविषयी बेलताना विद्या म्हणाली, 'इंदिरा गांधी यांच्यावर खूप साहित्य उपलब्ध असल्यानं आम्ही बायोपिक पेक्षा वेब सीरीज बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र ही वेब सीरीज किती भागात आणि कधी प्रदर्शित होणार हे मात्र अद्याप ठरलेलं नाही.' ही वेब सीरीज सागरिका घोष यांच्या, इंदिरा : इंडियाज् मोस्ट पॉवरफुल प्राइम मिनिस्टर या पुस्तकावर आधारित आहे.

इंदिरा गांधींच्या वेब सीरीजबाबत निर्माता रॉनी स्क्रूवाला सांगतात, 'आम्ही इंदिरा गांधींवर उपलब्ध असलेल्या सर्व साहित्याचा अभ्यास करत आहोत. अजून बऱ्याच गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत त्यामुळे ही वेब सीरीज कधी प्रदर्शित होणार याबाबत सध्या काहीच सांगता येणार नाही.' काही दिवसांपूर्वी विद्या बालन तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांच्या बायोपिकमध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा होती. तिचं लूक टेस्टिंगही झालं होतं पण नंतर तिच्या जागी कंगना रनौतची वर्णी लागली.

VIDEO: ट्रॅफीकमुळे पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं

First published: March 28, 2019, 1:34 PM IST

ताज्या बातम्या