बाहुबली-2मध्ये तमन्नाचा रोल का कापला ?

अनुष्का शेट्टीच्या भूमिकेसमोर तमन्ना काहीशी झाकोळली गेलीय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 1, 2017 11:42 PM IST

बाहुबली-2मध्ये तमन्नाचा रोल का कापला ?

01 मे : कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर बाहुबली-2 च्या रिलीजनंतर तुम्हाला मिळाले असेलच. पण या सिनेमाच्या रिलीज नंतर दुसराच एक प्रश्न निर्माण झालाय,तो म्हणजे राजामौली यांनी या सिनेमात तमन्नाचा रोल का कापला? चला तर मग याबद्दलच जाणून घेवुयात...

या सिनेमाच्या प्रमोशनापासूनच तमन्ना काहीशी दूर फेकली गेली होती. सिनेमाच्या रिलीजपूर्वी तमन्नाने तिच्या भूमिकेबाबत अनेक दावे केले होते. प्रत्यक्षात मात्र सिनेमा रिलीज झाल्यावर तिचे हे दावे फोल ठरले. अनुष्का शेट्टीच्या भूमिकेसमोर तमन्ना काहीशी झाकोळली गेलीय. सूत्रांच्या माहितीनूसार शुटिंग दरम्यान तमन्ना आणि दिग्दर्शक राजामौली यांच्यात काही मतभेद झाले होते. ज्याचा फटका तमन्नाला बसला.

परंतु तमन्नाच्या मते,ती राजामौली यांचा खूप आदर करते तसंच मतभेदाच्या बातम्या निराधार आहेत. तमन्ना प्रमोशनावेळीही फारशी दिसली नव्हती याबाबत खुलासा करताना ती म्हणाली की, ,ज्या ज्या वेळी मला बोलावण्यात आले तेव्हा तेव्हा मी गेलेय. पण इतर कलाकारांप्रमाणे सर्व ठिकाणी ती का दिसली नाही? या प्रश्नाचे मात्र तीच्याकडे उत्तर नाहीय. तसंच ' बाहुबली-2 च्या क्लायमॅक्समध्ये मी जास्त दिसले नसले तरीही त्यामुळे माझ्या भूमिकेचे महत्व कमी होत नाही' असंही तमन्नाचं म्हणणंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 11:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...