Home /News /entertainment /

Sunny Deol चा मुलगा Karan Deol ने गुपचूप उरकला साखरपुडा? अखेर अभिनेत्याच्या टीमने केला खुलासा

Sunny Deol चा मुलगा Karan Deol ने गुपचूप उरकला साखरपुडा? अखेर अभिनेत्याच्या टीमने केला खुलासा

सनी देओलचा मुलगा करण देओलने फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणतू द्रिशाशी साखरपुडा केल्याची चर्चा आहे.

    मुंबई, 13 मे : अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवत आहे. त्याच्या फिल्मी क्षेत्रातील पदार्पणामुळे तो चर्चेत आहेच पण आता खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आला आहे. करण फिल्मसह आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे, ते म्हणजे त्या साखरपुडा. करणने गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा आहे (Sunny Deol Son Karan Deol Engaged). करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणतू द्रिशाशी साखरपुडा केल्याची माहिती मिळते आहे (Karan Deol Engaged To Bimal Roy Great Granddaughter Drisha). ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार बऱ्याच कालावधी दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांनी हे नातं पुढे नेण्याचं ठरवलं. लवकरच दोघं लग्न करणार आहेत. दरम्यान करणच्या टीमने हे वृत्त फेटाळलं आहे. ही अफवा असल्याचं सांगितलं आहे. करणच्या टिमने दिलेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशाची लहानपणापासून मैत्री आहे. त्यांच साखरपुडा झाल्याचं वृत्त खरं नाही. हे वाचा - Actress-Model Sahana dead : खळबळजनक! Birthday दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच केली हत्या? करणने पल पल दिल के पास या फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लवकरच तो अनिल शर्माच्या अपने 2 या फिल्ममध्ये दिसणार आहेत. यात त्याच्या कुटुंबातील सदस्यही त्याच्या सोबत असणार आहे. आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओलही या फिल्ममध्ये असणार आहे. या बाप-लेकाच्या जोडीला सिल्वहर स्क्रिनवर पाहण्याची उत्सुकचा त्याच्या चाहत्यांनाही आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Entertainment

    पुढील बातम्या