मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहिद कपूर तिसऱ्यांदा होणार बाबा? पत्नीने दिली अशी रिअ‍ॅक्शन

शाहिद कपूर तिसऱ्यांदा होणार बाबा? पत्नीने दिली अशी रिअ‍ॅक्शन

करीनापाठोपाठ (Kareena Kapoor) शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरादेखील (Meera) आई – बाबा होणार का या चर्चांना उधाण आलं होतं. यावर स्वत: त्याच्या पत्नीनेच खुलासा केला आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 27 डिसेंबर: बॉलिवूडचा हँडसम हंक शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा (Meera) यांचा सुखाचा संसार सुरू आहे. शाहीद आणि मीराचं लग्न 2015 मध्ये झालं. लग्नानंतर एका वर्षात शाहीदच्या घरी मीशा नावाची परी जन्माला आली. त्यानंतर 2018 मध्ये शाहीदला पुत्ररत्न प्राप्त झालं. शाहीद जसा त्याच्या नवनव्या सिनेमांमुळे चर्चेत असतो तशीच त्याची पत्नी मीरादेखील नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. मीरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. काही दिवसांपासून मीरा आणि शाहीद तिसऱ्यांदा आई - बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मीराने नुकतंच इन्स्टाग्राम लाइव्ह केलं. त्यामध्ये तिच्या फॅन्सच्या प्रश्नांची तिने मनमोकळी उत्तरं दिली. काही लोकांनी तिला तिच्या प्रेग्नंसीबद्दल विचारलं त्यावेळी मीराने याही प्रश्नचं उत्तर दिलं. मीरा म्हणाली, ‘मला माहित नाही या सगळ्या चर्चा कुठून सुरू झाल्या. पण सध्यातरी अशी काही बातमी आमच्याकडे नाहीये.’
इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये मीराला तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दलही प्रश्न विचारला त्यावर तिने सांगितलं, ‘हो माझा बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार आहे. पण सध्यातरी कोणता चित्रपट किंवा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नाही.' मीरा स्वत: एक फॅशन स्टायलिस्ट आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शहीद कपूर लवकरच आपल्याला जर्सी चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याच्या शूटिंगमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. जर्सी या सिनेमाचं दिग्दर्शन गौतम टिन्नानूरी यांनी केलं आहे. या सिनेमामध्ये शाहीद कपूरसोबत मृणाल ठाकूरही दिसणार आहे. जर्सी हा सिनेमा तेलुगू भाषेतील जर्सीचा रिमेक आहे. या सिनेमात शाहीद कपूर क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही फिल्म कधी रीलिज होणार याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नसली तरी शाहीदला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असल्यामुळे त्याचे चाहते उत्सुक आहेत.
First published:

Tags: Bollywood, Shahid Kapoor-Mira Rajput

पुढील बातम्या