खरंच की काय! वीर बाजीप्रभूंची भूमिका संजय दत्त करणार? सोशल मीडियावरच्या पोस्टने चर्चेला उधाण

खरंच की काय! वीर बाजीप्रभूंची भूमिका संजय दत्त करणार? सोशल मीडियावरच्या पोस्टने चर्चेला उधाण

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटाचे कर्ते अभिजीत देशपांडे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शूर शिलेदारावर चित्रपट घेऊन येत आहेत. त्यात शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार आणि बाजीप्रभूंचं काम कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

  • Share this:

मुंबई, 1 फेब्रुवारी : पानिपत, तान्हाजी यानंतर सध्या ऐतिहासिक चित्रपटांचं पेव फुटलं आहे. याच ट्रेंडमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. लेखक- दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाचे कर्ते अभिजीत देशपांडे लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शूर शिलेदारावर चित्रपट घेऊन येत आहेत. पन्हाळगडाच्या पायथ्याशी पराक्रम गाजवणाऱ्या आणि महाराज सुखरूप स्थळी पोहोचल्याची खात्री पटवणाऱ्या तोफा धडाडल्यावर पावनखिंडीत देह ठेवणाऱ्या या वीराची कहाणी मोठ्या पडद्यावर येणार आहे. स्वतः अभिजीत देशपांडे यांनीच Tweet करत पावनखिंड या चित्रपटाची घोषणा केली. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल असंही सांगितलं.

या Tweet ला अनेक रिप्लाय आले. अनेकांनी या चित्रपटाचं स्वागत केलं. एका यूजरने मात्र अभिजीत यांना बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत कुणाला घ्या असा सल्लाच दिला आहे.

'अभिनेता संजय दत्तचं व्यक्तिमत्त्व बाजीप्रभूंसारखंच आहे', असं सांगत या सिनेमात बाजीप्रभूंची भूमिका करण्यासाठी संजय दत्तलाच घ्या, असं एका यूजरने लिहिलं आहे. त्यावर अभिजीत देशपांडे यांनीसुद्धा ok असं लिहित त्याची दखल घेतली आहे.  त्यामुळे आता या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार आणि बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका कोण करणार याची चर्चा नव्याने सुरू झाली. बाजीप्रभू कुणी साकारावा याविषयी सल्ला, चर्चा यांन उधाण आलं आहे.

अन्य बातम्या

विराट कोहलीला टक्कर देतेय उर्वशी रौतेला, जिममधील हा VIDEO पाहून व्हाल हैराण

प्रियांका आहे कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण, घराची किंमत्त ऐकून व्हाल थक्क

रितेश देशमुखच्या मुलांनी गांधीजींबद्दल असं काय म्हटलं, पाहा VIDEO

First published: February 1, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या