News18 Lokmat

रणबीर खरंच सिंगल आहे?

मात्र हे सिंगल स्टेटस तो मुद्दाम बाळगून असल्याची चर्चा आता सुरू झालीय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2017 02:00 PM IST

रणबीर खरंच सिंगल आहे?

02 ऑक्टोबर: रणबीर कपूर सध्या त्याचं सिंगल स्टेटस एन्जॉय करतोय. मात्र हे सिंगल स्टेटस तो मुद्दाम बाळगून असल्याची चर्चा आता सुरू झालीय.

अनेक अभिनेत्रींशी ज्याचं नाव जोडलं गेलं तो रणबीर कपूर गेले बरेच दिवस सिंगल असल्याचं कळतंय. कतरिनासोबत काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर बरेच दिवस त्याचं नाव कुणाशीच जोडलं गेलं नाही. पण आता हे सिंगल स्टेटस तो दाखवण्यासाठी बाळगत असल्याची चर्चा आहे. मात्र हे सिंगल स्टेटस माहिरा खानला इंप्रेस करण्यासाठी तर तो बाळगतोय की काय अशी चर्चा सध्या सगळीकडे होते आहे.काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि माहिराचे न्यू-यॉर्कमध्ये हँग आऊट करतानाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतरच हे दोघे एकमेकांच्या जवळ आल्याची चर्चा सुरू झालीय. तसंच त्याच्या जवळच्या मित्रांच्या पार्टीमध्ये तो मुलींशी जास्त बोलतही नाही. आता रणबीर हे सिंगल स्टेटस माहिराला त्याच्याबद्दल खात्री वाटावी यासाठी बाळगतोय का अशी चर्चा आता सुरू झालीय.

त्यामुळे रणबीर खरंच सिंगल आहे की 'माहिरा' साठी बाळगतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...