Home /News /entertainment /

सेलिब्रिटींची होणार पोलखोल; करण जोहर पुन्हा एकदा घेऊन येतोय ‘कॉफी विथ करण’

सेलिब्रिटींची होणार पोलखोल; करण जोहर पुन्हा एकदा घेऊन येतोय ‘कॉफी विथ करण’

करण जोहरने दिले त्याच्या 'कॉफी विथ करण'च्या नव्या सिझनचे संकेत. यावेळी काय रंगत आणणार शो?

  मुंबई 17 जून : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय तसेच तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जाणारा ‘कॉफी विथ करणचा’ (Koffee With Karan)  नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर येत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचा (Karan Johar) हा शो नेहमीच चर्चेत राहतो. प्रियंका चोप्रा, कॅटरीना कैफ, दीपिका पादूकोन, आलिया भट्ट, रणवीर सिंगयासारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटीझनी या शोमध्ये हजेरी लावलेली आहे. करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या शोच्या नव्या पर्वाचे संकेत दिले आहे. त्याने लिहिलं आहे, ‘करण ऑन फॉफी ... सिझन..?’ यामुळे करण जोहर आता नवा सिझन घेऊन येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे करणचा हा शो आला तर नक्कीच प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडणार आहे. हा टॉक शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे. अनेक सेलिब्रिटींनी यामध्ये केलेल्या विवादीत वक्तव्यांमुळे या कार्यक्रमावर अनेकदा टीका झालेली आहे. मागील वर्षी क्रिकेटर हार्दीक पांड्याच्या (Hardik Pandya) विवादीत वक्तव्यांमुळे हा शो चर्चेत आला होता.
  View this post on Instagram

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  तेव्हा आता या पर्वात कोण नवे सेलिब्रिटी पाहायला मिळाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याशिवाय करण कोणाची पोलखोल करणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. परंतू याविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

  HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

  करण जोहर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांतही व्यस्त आहे. नुकतीच एका नव्या चित्रपटचीही घोषणा करण्यात आली होती. ‘प्रेम कहानी’ (Prem Kahani) असं या नव्या चित्रपटाचं नाव असून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय अन्य ही काही चित्रपटांवर काम सुरू आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Karan Johar

  पुढील बातम्या