मुंबई, 10 मार्च: काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) गोहर खानच्या (Gauhar Khan) वडिलांचं निधन झालं आहे. वडिलांच्या निधनाचं दुःख कमी होत नाही, तोपर्यंत तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या (Pregnancy News) समोर येत आहेत. तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांवरून गौहर खान सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच भडकली आहे. तिने एक ट्विट करून गरोदरपणाच्या बातम्या निराधार असल्याच सांगितलं आहे. तसेच तिने अशा बातम्या देणाऱ्या वृत्तमाध्यमांना फटकारही लगावली आहे..
गौहर खानने नुकतचं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून तिने Asianetnews च्या वृत्ताला निराधार असल्याचं म्हटलं आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'तुझं डोकं खराब आहे आणि तथ्य पण. काहीही टाइप करण्या अगोदर तथ्य तपासून पाहत जा. मी अलीकडेच माझ्या वडिलांना गमावलं आहे. त्यामुळे असे निराधार वृत्त देण्यापूर्वी थोडी संवेदनशीलता जपा.' तिने याच ट्वीटमध्ये Asianetnews ला टॅग करत म्हटलं की, 'मी प्रेग्नेट नाहीये, मनापासून आभार!'
Tumhara dimaag kharaab hai ! Aur facts bhi . 12 saal chote waali galat news hui purani , so get ur facts right b4 typing ! I’ve just lost my dad so have some sensitivity towards ur baseless reports. @AsianetNewsHN . I am not pregnant, thank you very much ! 😡 https://t.co/TB3242u5Fv
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) March 10, 2021
हे ही वाचा - वयातील अंतरावरुन टीका करणाऱ्यांना गौहर खानचं सणसणीत उत्तर; म्हणाली झैद आणि मी...
यापूर्वीही गौहर खान आणि तिच्या पतीच्या वयातील अंतरामुळे चर्चेत आली होती. यावेळी तिने दोघांच्या वयातील अंतराबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, 'मी येथे हे स्पष्ट करू इच्छिते की, जे लोकं आमच्या वयातील अंतराबाबत चर्चा करत आहेत, ते पूर्णपणे निराधार आहेत. वयाच्या अंतराबाबत बातमी करणं खूप सोपं आहे, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे. होय, जैद हा माझ्यापेक्षा काही वर्षे लहान आहे, परंतु तो थेट 12 वर्षांनी लहान नक्कीच नाही. तो माझ्यासाठी एक योग्य व्यक्ती आहे, आणि त्यानं माझं आयुष्यात खूप सकारात्मर गोष्टी केल्या आहेत. तसेच आम्ही एकत्र खूप आनंदी आहोत. '
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Pregnancy, Tweet