• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • दिव्यांका त्रिपाठी होणार नवी दयाबेन? 'तारक मेहता...' मध्ये कोणाची लागणार वर्णी

दिव्यांका त्रिपाठी होणार नवी दयाबेन? 'तारक मेहता...' मध्ये कोणाची लागणार वर्णी

दयाबेनचं पात्र अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी साकारणार? पाहा अभिनेत्रीनेच सांगीतलं सत्यं.

 • Share this:
  मुंबई 27 जून: छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये गेली काही वर्षे प्रेक्षक दयाबेनची (Dayaben) आतुरतेने वाट पाहत आहेत. पण दयाची एन्ट्री काही होत नाही. अनेकदा दया परतणार असल्याच्या बातम्या आल्या पण त्यात काहीच तथ्य निघालं नाही. मालिकेचे निर्माते अनेक दिवस दयाला परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दया हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी (Disha Vakani) मात्र यायला तयार नाही. टीव्ही मालिकांत पहिल्यांदाच एका पात्रासाठी रिप्लेसमेंट न करता इतकी वर्षे वाट पाहिली गेली असेल. पण अभिनेत्रीने न येण्याचाच निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे. त्यामुळे आता निर्माते नवी दयाबेन शोधत आहेत.

  HBD : 6 वर्ष मोठ्या आशा भोसलेंवर होतं बर्मन यांचं प्रेम; लता दिदींनी केली होती मदत

  टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची (Divyanka Tripathi) दायाबेन म्हणून वर्णी लागणार असल्याचं वृत्त नुकतच समोर आलं होत. पण ते कितपत खरं हे स्वतः दिव्यांकानेच सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला (TOI) दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटलं आहे की, “ही एक लोकप्रिय मालिका आहे आणि तिचा मोठा प्रेक्षक वर्गही आहे. पण मला नाही वाटत मी हे करायला उत्सुक आहे. मी फ्रेश आणि नव्या कॉन्सेप्ट पाहत आहे.  या प्रकारच्या अफवा निराधार असतात तर त्यात काहीच तथ्य नाही. त्यामुळे दिव्यांकाने हे वृत्त खरं नसल्याचं म्हटलं आहे.”
  दिव्यांकाने नुकतच तिचं खतरों के खिलाडीचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तर ती भारतात परतली आहे. त्यामुळे मालिकेत नक्की कोण दयाबेन दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेली तब्बल 13 वर्षे सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
  Published by:News Digital
  First published: