Home /News /entertainment /

FACT CHECK : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBI केस बंद करणार का?

FACT CHECK : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी CBI केस बंद करणार का?

SSR Case : सुशांतच्या मृत्यू प्रकरणात CBI ला काहीही काळंबेरं आढळून आलेलं नाही, अशा अर्थाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर CBI चं काय म्हणणं आहे वाचा...

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput death case) प्रकरणाचा तपास करत असलेली केंद्रीय संस्था CBI लवकरच ही केसं बंद करणार आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात CBI ला काहीही काळंबेरं आढळून आलेलं नाही आणि सुशांतने आत्महत्याच केली या निष्कर्षापर्यंत तपास आल्याने आता लवकरच केस बंद होणार, या अर्थाच्या बातम्या दिवसभर अनेक माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. काय आहे यातलं तथ्य? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) या बातम्यांची दखल घेत स्वतःच या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या या खऱ्या नसून अफवा आहेत. CBI या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही तो थांबवलेला नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत अद्याप आम्ही पोहोचलेलो नाही. त्यामुळे यांदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. सीबीआय तपासाबद्दलच्या आणि निष्कर्षाबद्दलच्या बातम्या अफवा आहेत, असं निवेदन CBI ने दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. 14 जून रोजी सुशांत आपल्या वांद्रे येथील घरी मृत अवस्थेत सापडला. सेंट्रल ब्‍यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (CBI) लवकरच संपूर्ण प्रकरणाचा तपास संपवून क्लोजर रिपोर्ट जारी करण्याची शक्यता आहे, अशा बातम्या गुरुवारी सकाळपासून माध्यमांमधून फिरत होत्या. टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, 'सीबीआयला या प्रकरणी काहीही काळंबेरं असल्याचं दिसलं नाही. त्यामुळे ते क्लोजर रिपोर्ट तयार करून बिहार कोर्टापुढे सादर करणार आहेत.' यापूर्वी दिल्लीच्या AIIMS इथल्या फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाने सुशांतचा ऑटोप्सी रिपोर्ट तपासासाठी CBI कडे सोपवला होता. यानुसार, सुशांतची हत्या झाली असण्याची शक्यता शून्य आहे, असं सांगण्यात आलं होतं. सुशांत सिंह राजपूत  मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलही महत्त्वाचा ठरतो आहे. त्यामुळे नार्कोटिक्स विभागाने (NCB) सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि मॅनेजर या सगळ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी एक महिना कोठडीत असलेली रिया नुकतीच मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने बाहे आली. रिया आणि तिच्या परिवाराविरोधात सुशांतच्या वडिलांनी गुन्हा नोंदवला आहे. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: CBI, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या