'2020 मध्ये तू होतास रे पण आता....' इरफान खानच्या पत्नीची भावुक पोस्ट

इरफान खानची (Irrfan Khan) पत्नी सुतापा सिकदारने (Sutapa Sikdar) 2020 ला निरोप देताना इरफानसाठी एका इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्याच्या कडा पाणावतील.

इरफान खानची (Irrfan Khan) पत्नी सुतापा सिकदारने (Sutapa Sikdar) 2020 ला निरोप देताना इरफानसाठी एका इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्याच्या कडा पाणावतील.

 • Share this:
  मुंबई, 31 डिसेंबर: 2020 हे वर्ष जगातील अनेक व्यक्तींसाठी वाईट गेलं. आधी कोरोना (Coronavirus) त्यामुळे सुरू झालेला लॉकडाऊन (Lockdown) त्यानंतर निर्माण झालेली बेरोजगारी. यामुळे सर्वांच्याच नाकी नऊ आले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीलादेखील हे वर्ष तितकसं चांगलं गेलं नाही. कोरोनामुळे बंद असलेली शूटिंग्ज, त्यानंतर सिनेमागृह देखील बंद असल्यामुळे बॉलिवूडचं बरंच नुकसान झालं. यंदा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचं दुर्दैवी निधन झालं त्यामध्ये एका होता अभिनेता इरफान खान (Irrfan Khan). इरफान जरी गेला असला तरी त्याच्या मुलाच्या आणि पत्नीच्या मनात तो अजूनही घर करुन आहे. इरफान खानची पत्नी सुतापा सिकदारने (Sutapa Sikdar) त्याच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सुतापाने इरफानचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओमध्ये इरफान त्याच्या घरी बेडवर बसला आहे असं दिसत आहे. त्यासोबत सुतापाने पोस्ट लिहीलं आहे, ‘मला 2020 वर्षाला सर्वात वाईट वर्ष म्हणता येत नाही कारण त्या वर्षात तू होतास रे गेल्या वर्षी या दिवशी तू माझ्या सोबत होतास घरात बागकाम करत होतास. पण आता तू नाहीस मग 2021 चं स्वागत मी एकटी कशी करू’
  It's so difficult to wish 2020 as the worst year as you were still there.last year this day next to me,gardening, busy... Posted by Sutapa Sikdar on Thursday, December 31, 2020
  29 एप्रिल 2020 रोजी इरफानने जगाचा निरोप घेतला. कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. इरफानच्या जाण्याने अनेकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं. बॉलिवूडमधील कलाकार, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, नेतेमंडळी, खेळाडू आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं होतं. रफान खानचा सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स (The Song of Scorpions) हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स या सिनेमात इरफान खानने एका व्यापाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात इरफानसोबत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान आणि अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी (Golshifteh Farahani) झळकणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published: