मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बाबिल वडिलांच्या आठवणीने व्याकूळ; इरफान खानने काढलेला बालपणीचा PHOTO केला शेअर

बाबिल वडिलांच्या आठवणीने व्याकूळ; इरफान खानने काढलेला बालपणीचा PHOTO केला शेअर

इरफान खानचा (Irrfan Khan) मुलगा बाबिल (Babil Khan) आपल्या वडिलांच्या आठवणींना सोशल मीडियावर उजाळा देत असतो. बाबिलने त्याच्या बालपणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 27 नोव्हेंबर: दिवंगत अभिनेता इरफान खानच्या (Irrfan Khan)  निधनाचं दु:ख त्याचा मुलगा अजूनही पचवू शकला नाही असंच दिसत आहे. इरफान खानचा मुलगा बाबिल (Babil Khan) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. वडिलांच्या जुन्या आठवणी शेअर करत असतो. बाबिलने नुकतेच 2 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातला एक त्याच्या बालपणाचा फोटो आहे. आणि दुसऱ्या फोटोमध्ये मध्ये त्याने आईसाठी चित्र काढल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो इरफान खानने काढला होता. असं बाबिलने सांगितलं आहे.

यातल्या एका फोटोमध्ये लहानपणीचा बाबिल चित्र काढताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये त्याने काय चित्र काढलं आहे. ते दिसत आहे. त्याने स्वत:च्या आईसाठी हे चित्र काढल्याचं दिसत आहे. या चित्रामध्ये ‘आय लव्ह यू आई – बाबिलकडून’ असं त्याने लिहीलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Babil (@babil.i.k)

इरफानच्या मुलाने शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने कॉमेंट केली आहे, ‘हा फोटो पहिला आणि मला माझं बालपण आठवलं’ तर काहींनी या फोटोंवर ‘क्यूट’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी इरफानच्या आठवणी जागवल्या आहेत.

बाबिल आपल्या वडिलांसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने काही दिवसांपूर्वी इरफानसोबतचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात कॅप्शनमध्ये त्याने असं लिहीलं होतं की, ‘बाबा अजूनही तू कायमचा सोडून गेला आहेस यावर विश्वासच बसत नाही. असं वाटतं की, तू एखाद्या मोठ्या शूटिंगसाठी गेला आहेस.’

First published:

Tags: Bollywood