मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

इरफान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची अखेरची संधी; 2021 मध्ये हा सिनेमा होणार रीलिज

इरफान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची अखेरची संधी; 2021 मध्ये हा सिनेमा होणार रीलिज

तुम्ही जर इरफान खानचे (Irrfan Khan) चाहते असाल तर तुम्हाला इरफानला मोठ्या पडद्यावर बघण्याची शेवटची संधी लवकरच मिळणार आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 28 डिसेंबर: दमदार अभिनय आणि आशयघन चित्रपटांची निवड करणारा अभिनेता म्हणून दिवंगत इरफान खानचं (Irrfan Khan) नाव आजही घेतलं जातं. त्याचे चित्रपट आपलं मनोरंजनही करायचे आणि काहीतरी संदेश देऊन जायचे. इरफानला जर तुम्ही मिस करत असाल तर त्याला मोठ्या पडद्यावर बघण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. कारण इरफान खानचा सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स (The Song of Scorpions) हा सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. तरण आदर्श यांनी या चित्रपटाबद्दल त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स या सिनेमात इरफान खानने एका व्यापाऱ्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात इरफानसोबत ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री वहीदा रहमान आणि अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी (Golshifteh Farahani) झळकणार आहे. गोलशिफ्तेह ही इराणी अभिनेत्री आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल इरफानच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. आता त्यांची इच्छा पुढील वर्षातच पूर्ण होणार आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानने जगाचा निरोप घेतला. कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानला न्यूरो एंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. इरफानच्या जाण्याने अनेकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलं होतं. बॉलिवूडमधील कलाकार, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, नेतेमंडळी, खेळाडू आणि त्याच्या असंख्य चाहत्यांनी त्याच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं होतं.
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या