इरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार

इरफानच्या तब्येतीत सुधार, लवकरच भारतात परतणार

इरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • Share this:

लंडन, २४ ऑगस्ट- गेले काही दिवस न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करणारा अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत आता सकारात्मक बदल होत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना यश येत असून लवकरच इरफान भारतात परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर आजारातून पुर्णपणे बाहेर झाल्यानंतर तो सिनेमात पुनरागमन करणार असल्याचे खुद्द इरफानने स्पष्ट केलं आहे. सध्या अनेक जणांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. बॉलिवूडचे मनिषा कोइराला, अनूराग बसू यांसारख्या कलाकारांनी कर्करोगावर मात करून आयुष्याची सेकेंड इनिंग सुरू केली आहे. त्याचप्रमाणे इरफानने देखील त्याच्या आजारावर मात करून आता त्याच्या आयुष्यातील सेकेंड इनिंगची सुरूवात करणार आहे. त्याचा सहावा किमो यशस्वी पार पडल्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक चित्रपट स्वीकारला आहे. लंडनमधून भारतात परतल्यावर इरफान सगळ्यात आधी हिंदी मीडियम या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करणार असल्याचं इरफानने स्पष्ट केलंय. इरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. सहा केमोथेरपी झाल्यावर पुन्हा एकदा कर्करोगाच्या सर्व चाचण्या करण्यात येतील. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे. माझ्या या आजारामुळे मृत्यू मला कधीही कवटाळू शकतो असेही त्याने यावेळी म्हटले.

Yogi aur Jaya ko pyaar dene ke liye dhanyawad 🙏👍

A post shared by Irrfan (@irrfan) on

मध्यंतरी पाकिस्तानच्या एका स्पोर्ट अँकरनं इरफानचा लंडनमधला इंग्लड विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना पाहतानाचा फोटो शेअर केला होता. इरफानला अशा प्रकारे आनंदी मूडमध्ये पाहून त्याच्या फॅन्सना खूप आनंद झालाय. तो लवकर बरा होऊन भारतात परतू दे, हीच इच्छा सर्वजण करतायत.

इरफान खान सांगतो, मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 03:25 PM IST

ताज्या बातम्या