S M L

अभिनेता इरफान खानला गंभीर आजार; म्हणतोय 'माझ्यासाठी प्रार्थना करा'

गेल्या काही दिवसांपूर्वी इरफान खानला कावीळ झाल्याची बातमी झळकली होती. तेव्हाही याची कल्पना इरफाननं ट्विटरच्या माध्यमातूनच दिली होती.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 6, 2018 09:47 AM IST

अभिनेता इरफान खानला गंभीर आजार; म्हणतोय 'माझ्यासाठी प्रार्थना करा'

06 मार्च : बॉलिवूडचा अभिनेता इरफान खान याला गंभीर आजारानं पछाडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो काहीसा अज्ञातवासात होता. विशेष म्हणजे तो त्याचा येणारा आगामी चित्रपट ब्लॅकमेलच्या प्रमोशनलाही उपस्थित नव्हता. यासंदर्भात इरफानच्या ट्विटवरून त्याला कोणत्या तरी भयंकर आजाराने पछाडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही उदास आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी इरफान खानला कावीळ झाल्याची बातमी झळकली होती. तेव्हाही याची कल्पना इरफाननं ट्विटरच्या माध्यमातूनच दिली होती. इरफान खान आजारी असल्यानं त्याची शूटिंगदेखील रद्द करण्यात आली आहे. त्याच्या या ट्विटमुळे आता त्याच्या चाहत्यांच्या इरफानच्या प्रकृतीची चिंता सतावू लागली आहे.

इरफान खानने ट्विटमध्ये लिहंल की....कधी-कधी तुम्हाला आयुष्यात एवढे झटके लागतात त्या धक्क्यांमुळे तुम्ही पूर्णपणे हलून जाता. माझ्या जीवनात मागचे १५ दिवस एका सस्पेंस स्टोरीसारखे होते. मला माहीत नव्हतं की दुर्मिळ कहाण्यांची माझी शोधमोहीम मला एक दिवस दुर्मिळ आजारापर्यंत नेईल.

मी कधीही माझे निर्णय आणि आव्हानांसमोर हार पत्करली नाही. त्यामुळेच या परिस्थितीलाही तोंड देईल. या कठीण वेळेत माझे कुटुंबीय माझा मित्र परिवार माझ्यासोबत आहेत. सर्वांना विनंती आहे, की कुणीही प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये.

डॉक्टर या आजाराच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतील तेव्हा पुढच्या 10 दिवसांत मी स्वतःच याबाबत माहिती देईन.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 6, 2018 09:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close