मुंबई, 03 मार्च: बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. मार्च 2018 मध्ये इरफाननं त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचं निदान झाल्याची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता तो उपचार घेऊन भारतात परतला असून त्यानं ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले. ‘जिंकण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपण स्वत:वर प्रेम करणं विसरून जातो. मात्र कठीण वेळातच आपल्याला त्याची जाणीव होते. मी माझ्या आयुष्याच्या या वळणावर थांबून मला मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होऊ शकलो’ असं ट्वीट इरफाननं केलं आहे.
— Irrfan (@irrfank) April 3, 2019
जवळपास वर्षभर कॅमेरापासून दूर असलेला इरफान भारतात परतल्यावर मुंबई विमानतळावर मंगळवारी (2 एप्रिल) सकाळी एअरपोर्टवर कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी त्यानं चेहऱ्याला काळ्या रंगाचा मास्क लावला होता पण फोटोग्राफर्सना पाहिल्यावर त्यानं हा मास्क काढला आणि त्यांना फोटो सुद्धा काढू दिले.
View this post on Instagram
Looking good sir. So happy 👍👍👍👍 #irfankhan #airportdiaries @viralbhayani
इरफान खान नुकताच 'न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर'वर उपचार घेऊन लंडनहून भारतात परतला आहे. सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नसला तरीही त्यांच्या तब्येतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. इरफान खान भारतात परतल्याच्या वृत्ताला तिग्मांशु धूलियानं दुजोरा दिला. एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर इरफानचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इरफानला सुखरुप परतल्याचं पाहून त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
#irfankhan today at the airport 👍👍👍👍 and he removes the Mask he was seen wearing earlier.
मार्च 2018 मध्ये आपल्या आजारपणाची माहिती दिल्यानंतर इरफान लगेचच उपचारांसाठी लंडनला रवाना झाला होता. पण या आजारातून तो आता पूर्णपणे बरा झाला असून लवकरच तो हिंदी मीडियम 2 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. खरंतर या सिनेमाचं शूटिंग ऑगस्ट 2018 मध्येच सुरू होणारं होतं मात्र इराफानच्या उपचारांचं शेड्यूल वाढल्यानं हे शूटिंग पुढे ढकलण्यात आलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा