Home /News /entertainment /

इरफानच्या या कँडिड PHOTO मुळे चाहते भावूक, मुलगा बाबीलने शेअर केली आठवण

इरफानच्या या कँडिड PHOTO मुळे चाहते भावूक, मुलगा बाबीलने शेअर केली आठवण

इरफानचा मुलगा बाबील देखील त्याच्या आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने इरफानचे काही कँडिंड क्षण इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.

  मुंबई, 12 मे : बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आता या जगात नसला तरी त्याच्या अनेक आठवणी प्रत्येकजण जपण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी त्याच्याबरोबर थेट आठवणी नसल्या तरीही त्याच्या सिनेमांच्या, त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून अनेकजण त्यांची ठेव जपत आहेत. 29 एप्रिल 2020 रोजी इरफान हे जग सोडून निघून गेला. त्याच्या जाण्याने बॉलिवूडचे तर न भरून निघणारे नुकसान झाले आहे. सध्या सोशल मीडियावर इरफानचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे किती आनंदी आयुष्य तो जगला असं म्हणत चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य देखील उमटतं पण त्याचवेळी त्यांना आता तो नाही हे वाटल्यानंतर भावूक देखील व्हायला होत आहे. इरफानचा मुलगा बाबील देखील त्याच्या आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने इरफानचे काही कँडिंड क्षण इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. नुकताच त्याने इरफान त्याच्या मांजरीबरोबर खेळताचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्याबरोबर एक मोनोक्रोम फोटो देखील शेअर केला आहे, ज्यातून सहज लक्षात येत इरफानचे त्याच्या मांजरीवर किती प्रेम होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

  इरफानचा मृच्यू कोलन इन्फेक्शनमुळे झाला. जवळपास दोन वर्षांसाठी तो न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर या आजाराशी झगडत होता. अमेरिकेत त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले होते. मात्र त्याची ही लढाई 29 एप्रिल रोजी संपली. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याने जगलेले हे आनंदी क्षण नक्कीच अनेकांच्या स्मरणात दीर्घकाळासाठी राहतील.
  View this post on Instagram

  A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

  View this post on Instagram

  A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तर इरफानच्या आठवणींचा खजिना आहे. हे फोटो देखील बाबीलनेच शेअर केले आहेत. या फोटोंकडे पाहिल्यानंतर इरफानची मेहनत, कलेप्रती असणारं प्रेम लख्ख दिसून येत आहे.
  View this post on Instagram

  NSD.

  A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

  बाबीलने मातृदिनावेळीही त्याची आई सुतापा आणि इरफानबरोबरचा गोड फोटो शेअर केला आहे.
  View this post on Instagram

  Long live the queen. Extended Mother’s Day.

  A post shared by Babil Khan (@babil.i.k) on

  इरफान आणि सुतापा यांच्या धाकट्या मुलाने- अयान याने देखील त्याच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. परफेक्ट 'फॅमिली मॅन' असणाऱ्या इरफानचे हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांचे डोळे पुन्हा एकदा पाणावत आहेत.
  View this post on Instagram

  The flesh we roam this earth in is a blessing, not a promise.

  A post shared by ayAAn khan (@arkane_7) on

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या