...आणि व्हिलचेअरवर बसून भारतात परतला बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता

...आणि व्हिलचेअरवर बसून भारतात परतला बॉलिवूडचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता

52 वर्षीय या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता इरफान खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मीडियम'मुळे प्रचंड चर्चेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्याआधी इरफानला 'न्यूरो इंडोक्राइन टयूमर' नावाचा आजार झाला होता. यातून ठिक झाल्यानंतर इरफाननं सिनेमाचं शूट सुरू केलं होतं. मात्र नुकताच तो मुंबई एअरपोर्टवर व्हिलचेअरवर बसलेल्या अवस्थेत स्पॉट झाला. पण पुन्हा एकदा इरफानला अशा अवस्थेत पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

अभिनेता इरफान खान नुकताच मुंबईमध्ये परतला मात्र एअरपोर्टवर तो व्हिलचेअरवर बसलेल्या आवस्थेत दिसला. यावेळी त्यानं ब्लॅक जॅकेट आणि ब्लू जीन्स घातली होती. तसेच एका कपड्यानं त्यानं आपला चेहरा झाकला होता. तसेच डोक्यावर कॅप सुद्धा घातली होती. इरफान अशा अवस्थेत पाहल्यावर सर्वांनाच धक्का बसला. तर दुसरीकडे सर्वांचा गोंधळ उडाला आहे की, त्याची ही अवस्था नेमकी झाली कशामुळे. मात्र इरफाननं मीडियाशी बोलणं टाळलं. तसेच एअरपोर्टवर न थांबता तो लगेचच तिथून निघून गेला.

मिलिंद सोमणची बायको त्याला 'बाबा' म्हणून हाक मारते? VIDEO VIRAL

काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याचा आगामी सिनेमा, 'अंग्रेजी मीडियम'चं शूटिंग करत होता. यासोबतच तो त्याच ठिकाणी आजारावर उपचारही घेत होता. त्यानंतर तो थेट मुंबईला पोहोचला मात्र यावेळी त्यानं आपला चेहरा झाकून घेतला होता. इरफाननं मीडियापासून वाचण्यासाठी चेहरा झाकला असला तरीही त्याला लोकांनी ओळखलंच.

Loading...

लता मंगेशकरांच्या प्रतिक्रियेवर रानू मंडलनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाल्या...

इरफानची ही अवस्था पाहिल्यावर लक्षात येतं की, तो सध्या या आजारपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर यातून बरा व्हावा अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत. 52 वर्षीय या अभिनेत्याला न्यूरो इंडोक्राइन टयूमर नावाचा आजार झाला आहे. ज्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आपल्या आजाराविषयी इरफाननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन माहिती दिली होती.

'हस्तमैथुन करतो हे बाबांना कळलं होतं तेव्हा...' बॉलिवूड हिरोनं सांगितला किस्सा

================================================================

VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...