'अंग्रेजी मीडियम'च्या सेटवर क्रिकेट खेळताना दिसला इरफान खान

'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा इरफानच्या 'हिंदी मीडियम' या सिनेमाचा दुसरा भाग आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 02:08 PM IST

'अंग्रेजी मीडियम'च्या सेटवर क्रिकेट खेळताना दिसला इरफान खान

मुंबई, 26 एप्रिल : अभिनेता इरफान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'अंग्रेजी मीडियम'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा इरफानच्या 'हिंदी मीडियम' या सिनेमाचा दुसरा भाग आहे. पण या सिनेमाची कथा मात्र हिंदी मीडियमपेक्षा खूप वेगळी असून या सिनेमाचं दिग्दर्शन होमी अदजानिया करत आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये इरफान खान मुख्य भूमिकेत असून या सिनेमाचं शूटिंग सध्या राजस्थानमध्ये सुरू असून काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि दिग्दर्शक यांनी या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर सिनेमाच्या सेटवरील आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
 

Loading...

View this post on Instagram
 

Life is better when you’re laughing ... Okay 🙄... Actually I’m just cracking a really f@#k all joke and @irrfan is a really fab actor. #laughingtillyourbellyhurts everyday 😊😂 #shootlife #angrezimedium #champakmithaiwala @maddockfilms


A post shared by Homi Adajania (@homster) on

आता दिग्दर्शक होमीनं इरफानचा एक फोटो नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या फोटोमध्ये इरफान खान क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा फोटो शएअर करताना होमीनं त्याला, 'कॅन वी शूट प्लिज' असं कॅप्शन देत त्याला स्माइलीच्या इमोजी सुद्धा जोडल्या आहेत. यावेळी इरफान सिनेमातील पात्र चंपक लालच्या गेटअपमध्ये असून तो बॅटिंग करताना दिसत आहे.


'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाचे निर्माता दिनेश विजान आहेत. राजस्थान मधील शूटिंग संपल्यावर सिनेमाची टीम उर्वरित शूटसाठी लंडनला रवाना होणार आहे. या सिनेमात इरफान व्यतिरिक्त राधिका मदन, करीना कपूर आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत आहे राधिका मदन या सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारत आहे तर करीना कपूर पोलिस आधिकाऱ्याच्या (कॉप) भूमिकेत दिसणार आहे.

इरफान खान काही दिवसांपूर्वीच कॅन्सरवर उपचार घेऊन लंडनहून भारतात परतला आहे. मागील वर्षी (2018) त्याला 'हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर'चं निदान झालं होतं. आजारपणावर यशस्वी मात केल्यानंतर इरफानचा हा पहिलाच सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...