‘अंग्रेजी मीडियम’मध्ये असा दिसणार इरफान खान, नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल

‘अंग्रेजी मीडियम’मध्ये असा दिसणार इरफान खान, नवा लुक सोशल मीडियावर व्हायरल

सुरुवातीला सिनेमाची अभिनेत्री म्हणून राधिका मदन आणि करिना कपूर खान यांची नावं समोर येत होती. दोघींपैकी कोणाला हा सिनेमा मिळणार याची उत्सुकता होती.

  • Share this:

उदयपुर, ८ एप्रिल- गंभीर आजारावर उपचार घेतल्यानंतर नुकताच अभिनेता इरफान खान भारतात परतला. मायदेशात परतल्यानंतर इरफानने 'अंग्रेजी मीडियम' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली. सुरुवातीला सिनेमाची अभिनेत्री म्हणून राधिका मदन आणि करिना कपूर खान यांची नावं समोर येत होती. दोघींपैकी कोणाला हा सिनेमा मिळणार अशी उत्सुकता असताना, मीडिया रिपोर्टनुसार, आता दोघीही या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करत म्हटलं की, ‘दिग्दर्शक जेवढा उत्साहित असतो तेवढीच मीही उत्साहीत आहे.’ तिने या पोस्टसह इरफान खान आणि करिना कपूर खानला टॅग केलं. यावरून या सिनेमात एक नव्हे तर दोन अभिनेत्री असणार हे स्पष्ट झालं आहे.

काही दिवसांपूर्वी इरफानचे एरअपोर्टवरचे फोटो समोर आले होते. या फोटोमध्ये त्याने स्वतःचा चेहरा लपवला होता आणि टोपीही घातली होती. दुर्दम्य आजारावर मात करत इरफान सध्या उदयपुरमध्ये त्याच्या आगामी अंग्रेजी मीडियम सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. नुकताच त्याने या सिनेमातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये घसिटेराम या मिठाईच्या दुकानासमोर उभा राहिलेला इरफान दिसत आहे. जुन्या काळातलं हे दुकान पाहून सिनेमाची कथाही आधीच्या काळातील असेल असा तर्क लावला जात आहे. आपला हा फोटो शेअर करताना इरफानने लिहिले की, 'नवीन गोष्ट सांगायला मजा येणार आहे. तुम्हा सर्वांचं मनोरंजन करायला लवकरच येत आहे.'

करिनाला शेवटचे 'वीरे दी वेडिंग' सिनेमात पाहण्यात आले होते. तर राधिका मदनचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी राधिकाने 'पटाखा' आणि 'मर्द को दर्द नही होता' सिनेमात काम केलं. होमी अदजानियांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या सिनेमाची निर्मिती दिनेश विजन करत आहे.

अंग्रेजी मीडियम हा सिनेमा २०१७ मध्ये आलेल्या हिंदी मीडियम सिनेमाचा सीक्वल आहे. हिंदी मीडियम सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर होती. मात्र भारत- पाकिस्तानातील तणावामुळे तिला सीक्वलमध्ये घेण्यात आले नाही. हिंदी मीडियम सिनेमातील व्यक्तिरेखेमुळे सबाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर

First published: April 8, 2019, 1:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading