मुंबई, 23 जून : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येप्रकरणी सध्या तपास सुरू आहे. पोलीस सुशांतशी संबंधित प्रत्येकाचे जबाब नोंदवून घेत आहेत. सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या डॉक्टरांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना काय माहिती दिली हे समोर आल्यानंतर अनेकांनी डॉक्टरांवर टीका केली. अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदरही (sutapa sikdar) त्यामध्ये होती.
सुशांतची खासगी माहिती दिल्याने सुरुवातीला सुतापाने डॉक्टरवर टीका केली. मात्र आता सत्य आहे हे समजल्यानंतर तिने डॉक्टरांची माफी मागितली आहे. सुतापाने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
सुतापा म्हणाली, "माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी मला सांगितलं की सुशांतच्या डॉक्टरांनी सुशांतबाबत अशी कोणतीही माहिती दिली नाही, ज्याबाबत सांगितलं जातं आहे. त्यामुळे मी माझी आधीची लिंक काढते आहे आणि डॉक्टरांची माफी मागते. मात्र त्यांनी आता संबंधित पत्रकारांविरोधात तक्रार दाखल व्हावी. मला आश्चर्य वाटतं की लोकं याबाबत प्रतिक्रिया का देत नाहीत? फक्त सुशांत सिंह राजपूतबाबतच नाही तर या बातम्या मिळतात तरी कशा?"
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीलादेखील ट्रोल केलं जात आहे आणि त्याचाही सुतापाने या पोस्टमध्ये विरोध केला आहे. "मला त्या मुलींचंही वाईट वाटतं आहे, ज्यांचं नाव त्या लेखात घेतलं होतं. विचार करा किती लोकांनी रियाला ट्रोल केलं असेल. त्या दोघांमध्ये काय झालं होतं, हे आपल्याला कधीच समजणार नाही आणि सोशल मीडियावर अशा मोरल जजमेंट देणं हे खूप वाईट आहे, आज कुणी उठतं आणि सोशल मीडियावर जज, थेरेपिस्ट, रिलेशनशिप काऊन्सलर बनतं.", असं सुतापा म्हणाली.
हे वाचा - शूटिंग बंद तर शेतात घाम गाळतोय बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, पाहा VIDEO
सुतापा पुढे म्हणाली, "दु:ख कित्येक वेळा प्रोडक्टिव्हही असतं. कुणीतरही मला तो लेख पाठवला आणि हा किती बेजबाबदारपणा आहे. मी पुन्हा त्या डॉक्टरांची माफी मागते"
संपादन - प्रिया लाड