कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफान खानचा हा हसरा फोटो पाहिलात का?

इरफान खान सध्या कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार करतोय, हे तर आपल्याला ठाऊक आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर आपला हसरा फोटो पोस्ट केलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 01:25 PM IST

कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या इरफान खानचा हा हसरा फोटो पाहिलात का?

लंडन, 16 जुलै : इरफान खान सध्या कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार करतोय, हे तर आपल्याला ठाऊक आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर आपला हसरा फोटो पोस्ट केलाय. एका खिडकीच्या काचेतून इरफान खानचा हसरा फोटो दिसतोय. त्याच्या कानात इयरफोनही आहेत. कदाचित तो एखादं गाणंही ऐकत असेल. नुकताच त्याला लंडनच्या भारतीय चित्रपट महोत्सवात स्पेशल आयकाॅनचा पुरस्कार मिळालाय. तो त्याला त्याच्या लंडनच्या घरी जाऊन दिला गेला. इरफानचे दोन सिनेमे या फेस्टिवलमध्ये दाखवले गेले. डूब: नो बेड आॅफ रोझेस आणि साँग आॅफ स्काॅरपिअन्स.

मध्यंतरी पाकिस्तानच्या एका स्पोर्ट अँकरनं इरफानचा लंडनमधला इंग्लड विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना पाहतानाचा फोटो शेअर केला होता. इरफानला अशा प्रकारे आनंदी मूडमध्ये पाहून त्याच्या फॅन्सना खूप आनंद झालाय. तो लवकर बरा होऊन भारतात परतू दे, हीच इच्छा सर्वजण करतायत.

अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर  या दुर्धर आजारावर लंडनमध्ये उपचार घेतोय. आपलं काम,करियर, आरामदायी आयुष्य सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला. या उपचारादरम्यान  टाइम्स नेटवर्कचे अंशुल चतुर्वेदी यांच्याशी इरफाननं संवाद साधला.काही दिवसांपूर्वी तो म्हणालाय, अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे हे मला neuroendocrine cancerशी लढताना समजली.

इरफान खान सांगतो,मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close