Elec-widget

दिवाळीत इरफान खानच्या फॅन्ससाठी चांगली बातमी

दिवाळीत इरफान खानच्या फॅन्ससाठी चांगली बातमी

सगळीकडे दिवाळीचा जल्लोष दिसतोय. बाॅलिवूडही दिवाळी पार्ट्यामध्ये दंग आहेत. पण इरफान खान या सगळ्यापासून दूर लंडनला कॅन्सरवर उपचार घेतोय.

  • Share this:

मुंबई, 5 नोव्हेंबर : सगळीकडे दिवाळीचा जल्लोष दिसतोय. बाॅलिवूडही दिवाळी पार्ट्यामध्ये दंग आहेत. पण इरफान खान या सगळ्यापासून दूर लंडनला कॅन्सरवर उपचार घेतोय. आता मात्र एक चांगली बातमी आहे.


इरफान खान दिवाळीत घरी परततोय. तो नाशिकच्या फार्महाऊसवर दिवाळीचं सेलिब्रेशन करणार आहे. उपचारादरम्यान तो 10 दिवसांचा ब्रेक घेणार आहे.  त्यानंतर तो पुन्हा लंडनला परतेल. हिंदी मीडियम 2च्या शूटिंगसाठी त्याला अजून तरी परवानगी मिळाली नाहीय. कदाचित मार्चपासून तो शूट सुरू करेल.


गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. सहा केमोथेरपी झाल्यावर पुन्हा एकदा कर्करोगाच्या सर्व चाचण्या करण्यात येतील. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे. माझ्या या आजारामुळे मृत्यू मला कधीही कवटाळू शकतो असंही त्याने यावेळी म्हटलं होतं.

Loading...


इरफान खान सांगतो, मी अनेक स्वप्नं आणि इच्छा आणि महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून एका भरधाव ट्रेनने जात होतो आणि अचानक टीसी येऊन म्हणाला तुमचा स्टाॅप आलाय. आता तुम्हाला उतरावं लागेल. इरफाननं त्यावेळी लिहिलेल्या पत्रानं सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता.


सध्या अनेक जणांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. बॉलिवूडचे मनिषा कोइराला, अनूराग बसू यांसारख्या कलाकारांनी कर्करोगावर मात करून आयुष्याची सेकेंड इनिंग सुरू केली आहे. त्याचप्रमाणे इरफानने देखील त्याच्या आजारावर मात करून आता त्याच्या आयुष्यातील सेकेंड इनिंगची सुरुवात करणार आहे. त्याचा सहावा किमो यशस्वी पार पडल्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक चित्रपट स्वीकारला आहे. लंडनमधून भारतात परतल्यावर इरफान सगळ्यात आधी हिंदी मीडियम या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करणार असल्याचं इरफानने स्पष्ट केलंय. इरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



सारा अली खानची बॉलिवूड एंट्री धोक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...