मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आई-वडिलांनी केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची हत्या; तुकडे करुन टाकले कचऱ्याच्या पिशवीत

आई-वडिलांनी केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची हत्या; तुकडे करुन टाकले कचऱ्याच्या पिशवीत

नामांकित दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; आई-वडिलांनीच केलं ऑनर किलिंग; कारण पाहून तुम्ही जाल पार चक्रावून

नामांकित दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; आई-वडिलांनीच केलं ऑनर किलिंग; कारण पाहून तुम्ही जाल पार चक्रावून

नामांकित दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; आई-वडिलांनीच केलं ऑनर किलिंग; कारण पाहून तुम्ही जाल पार चक्रावून

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 21 मे: ओथ टू याशर या लघुपटातून नावारुपास आलेले प्रसिद्ध ईराणी दिग्दर्शक बाबक खोरामदिन यांची खळबळजनकरित्या हत्या झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या आई-वडिलांनी मिळून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली असून हा प्रकार ऑनर किलिंगचा असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

अरब न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार बाबक गेली अनेक वर्ष इंग्लंड इथं वास्तव्य करत होते. मात्र अचाकन त्यांनी इंग्लंड सोडलं व ते आपल्या आई-वडिलांकडे राहायला आले. बाबक अविवाहित होते. त्यामुळं त्यांच्या लग्नावरुन अनेकदा आई-वडिलांसोबत वाद व्हायचे. शेवटी या सततच्या वादांना कंटाळून पालकांनीच त्यांची हत्या केली. त्यांना कॉफीमधून गुंगीचं औषध दिलं. परिणामी बाबक बेशुद्ध झाले. अन् त्या बेशुद्ध अवस्थेतच वडिलांनी त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे केले. त्यांना कचऱ्याच्या पिशवीत ठेवलं. मात्र ही पिशवी पोलिसांच्या हाती लागली. अन् पोलिसांनी खरं प्रकरण शोधून काढलं. अखेर पोलिसांसमोर आई-वडिलांना दिर्घ काळ शांत बसता आलं नाही. त्यांनी आपला गुन्हा मान्य केला.

त्या शीख दंगलीला बिग बी होते जबाबदार? 11 वर्षांपूर्वीचं पत्र पुन्हा होतंय व्हायरल

बाबक अविवाहित होते. त्यामुळं त्यांच्यात सतत भांडणं होत असतं. मुलामुळं त्यांना मानसिक त्रास होत होता. तो सतत त्यांचा अपमान करायचा. यामुळं घराबाहेर पडायचीही त्यांना लाज वाटायची त्यामुळं त्यांनी आपल्या मुलाची हत्या केली असा दावा गुन्हेगार आई-वडिलांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत. त्यांच्या दाव्यामध्ये किती तथ्त आहे याची शहानिशा केली जात आहे. दरम्यान बाबक यांच्या मृत्यूमुळं इराणी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

First published:

Tags: Crime, Entertainment