मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मिस्टर परफेक्शनिस्टचा 56व्या वर्षीही तरुणांना लाजवणारा फिटनेस; पाहून मुलगी आयरा म्हणाली..

मिस्टर परफेक्शनिस्टचा 56व्या वर्षीही तरुणांना लाजवणारा फिटनेस; पाहून मुलगी आयरा म्हणाली..

सध्या आमिरचा एक वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो अतिशय कठीण व्यायामप्रकार करत आहे.

सध्या आमिरचा एक वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो अतिशय कठीण व्यायामप्रकार करत आहे.

सध्या आमिरचा एक वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो अतिशय कठीण व्यायामप्रकार करत आहे.

मुंबई 3 ऑगस्ट : अभिनेता आमिर खान (Amir Khan) त्याच्या परफेक्शनसाठी प्रसिद्ध आहे. मग तो चित्रपटातील अभिनय असो किंवा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन नेहमीच तो परफेक्ट दिसतो. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट (Mr perfectionist) म्हटलं जातं. अनेकदा तो त्याच्या चित्रपटांसाठी त्या पात्रामध्ये स्वतःला रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करत असतो. याआधी अनेकदा त्याची ट्रान्सफॉर्मेशन पाहाण्यात आली आहे.

सध्या आमिरचा एक वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो जड डम्बेल्स उचलताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ ‘धूम 3’ (Dhoom 3) चित्रपटाच्या वेळेचा आहे. त्यावेळी आमिरने स्वतःमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले होते. त्याने स्वतःला अगदी तरुण केलं होतं. तर चित्रपटातील त्याचा परफॉर्मन्स अगदी हिट टरला होता. तर या व्हायरल व्हिडीओवर त्याची मुलगी आयरानेही (Ira Khan) आता प्रतिक्रिया दिली आहे.

पिंक पिंक! नोरा फेतेहीचा गुलाबी अवतार पाहून पडाल प्रेमात; फोटोंवर चाहते फिदा

आयरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिने या व्हिडीओला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कॅप्शन दिलं होतं. व ‘हे कोणतं वर्कआउट?’ असं लिहिलं आहे. आयरा चित्रपटांत नसली तरीही सोशल मीडियावर फार अँक्टिव्ह असते. तसेच अनेकदा चर्चेतही असते. आयरा स्वतःही फिटनेस फ्रिक आहे. अनेकदा ती तिचे बॉक्सिंगचे व्हिडीओ शेअर करत असते. तसेच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेमुळेही ती फार चर्चेत असते.

'येऊ..नांदायला' साळवी कुटुंब झालं बेघर, पिण्यासाठीही नाही पाणी; स्वीटूचं हे पाऊल ठरणार निर्णायक

दरम्यान मागील काही दिवांपासून आमिर खान फारच चर्चेत आहे. त्याची दुसरी पत्नी किरण रावशी (Kiran Rao) त्याने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला होता. तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. याशिवाय त्याचा आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्डा’च्या (Lalsingh Chadda) शुटींगमध्यही तो व्यस्त आहे.

First published:

Tags: Aamir khan, Bollywood actor, Entertainment