Home /News /entertainment /

डिप्रेशनबद्दल बोलणाऱ्या आमिरच्या मुलीची नवी पोस्ट; इराच्या स्वभावातला हा पैलू तुम्ही पाहिलाच नसेल

डिप्रेशनबद्दल बोलणाऱ्या आमिरच्या मुलीची नवी पोस्ट; इराच्या स्वभावातला हा पैलू तुम्ही पाहिलाच नसेल

नेहमी डिप्रेशन किंवा तणावाबद्दल व्हिडीओमधून संवाद साधणाऱ्या आमिर खानच्या (Aamir Khan) मुलीने सोशल मीडियावर एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. यात तिच्या स्वभावाचा एक वेगळा पैलू दिसून आला आहे.

  मुंबई, 02 नोव्हेंबर : बॉलिवूड स्टार (Bollywood star) आमीर खान याची मुलगी इरा खान (Ira Khan) फिटनेस ट्रेनर नुपूर शिखारेबरोबरच्या नात्यामुळे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असते. असलेल्या इराने नुकताच मैत्रिणीसोबतचा एक मजेदार फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे तिचे एक वेगळेच रूप पहायला मिळत आहे. यात ती आपली बेस्ट फ्रेंड डॅनियेला (Danielle)सोबत आहे. यामध्ये इरा आणि डॅनियेला वॉटरगन घेऊन काहीतरी करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर आमीर खानच्या दंगल चित्रपटातील अभिनेत्री फातिमा सना शेख हिने ‘क्युटी’ अशी कमेंट केली आहे. जीन्स आणि ब्लॅक टॉप अशा साध्या वेशात असलेली इरा या फोटोत अतिशय निरागस आणि गोड दिसत आहे. ती आणि डॅनियेला दोघीही वॉटर गन घेऊन कसल्यातरी तयारीत असल्याचे दिसत आहे. लहान मुलांचा अवखळपणा त्यांच्यात दिसतो आहे. इराने दिलेल्या कॅप्शनमधूनही हा खेळकरपणा डोकावतो आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांनीही लाइक्सचा पाऊस पाडला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Ira Khan (@khan.ira)

  इरा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सतत फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. लॉकडाऊनच्या काळात तिची आणि नुपूर शिखरेची घनिष्ट मैत्री जुळली असून त्यांचे नाते मैत्रीच्या पुढे गेल्याची चर्चा आहे. काही काळापूर्वी इराने बोल्ड फोटो शूट केले होते, तर लहानपणी लैंगिक शोषण झाल्याने आपण नैराश्यात गेल्याची कबुलीही तिने दिली होती. इराने गेल्या वर्षी आपल्या कारकिर्दीलाही सुरुवात केली आहे. अभिनेत्री म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून, तेही रंगभूमीवर. युरीपाईड्सचे प्रसिद्ध नाटक ‘मेडिया’चे दिग्दर्शन केलं होतं. मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमीर खानच्या पावलावर पाऊल टाकून इराही अभिनय क्षेत्रात येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती पण इराने सध्या तरी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood

  पुढील बातम्या