मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘..पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं’; आयराला आईनं दिलं होतं Sex Education चं पुस्तक

‘..पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं’; आयराला आईनं दिलं होतं Sex Education चं पुस्तक

आयराची आई रिना दत्ता यांनी तिला शरीर संबंधांविषयी माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं.

आयराची आई रिना दत्ता यांनी तिला शरीर संबंधांविषयी माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं.

आयराची आई रिना दत्ता यांनी तिला शरीर संबंधांविषयी माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 23 जुलै: आमिर खानची मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र तरी देखील एखाद्या सेलिब्रिटीला लाजवेल असं तिचं फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर आहे. तिची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. (Ira Khan Video Viral) अन् ती देखील विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करत फॉलोअर्सच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने सेक्स एज्युकेशबद्दल (Sex Education) माहिती दिली आहे.

आयराची आई रिना दत्ता यांनी तिला शरीर संबंधांविषयी माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं. याबद्दल आयरा म्हणाली, “मी यापूर्वी कधीही स्वत:च्या शरीराला इतकं निरखून पाहिलं नव्हतं. मला माझ्या आईनं सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती देणारं एक पुस्तक दिलं होतं. या पुस्तकात स्वत:ला आरशात पाह असं सांगितलं होतं. पण मी असं काहीही केलं नाही. माझं शरीर बदललं आहे पण मला आणखी मोठं ध्येय गाठायचं आहे.” तिने ही माहिती एक इन्स्टापोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली.

Video: देवी सिंगचे सर्व प्लॅन फसले; चंदामुळे ‘Devmanus’ जाणार तुरुंगात

राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

आयरा आपल्या मानसिक स्थितीबद्दल अनेकदा उघडपणे बोलते. आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे तिच्या मनावर विपरित परिणाम झाले हा अनुभव देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. नैराश्येत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी तिने अगास्तु फाऊंडेशन नामक एक स्वयंसेवी संस्था देखील सुरु केली आहे. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ती या संस्थेत कार्यरत आहे.

First published:

Tags: Aamir khan, Entertainment, Sex education