सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारन्टाइन

सुशांत आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारन्टाइन

तपासासाठी मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेनं क्वारन्टाइन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला (sushant singh Rajput suicide case) अनेक दिवस लोटल्यानंतरही या प्रकरणाच्या तपासादरम्यान रोज नवनव्या गोष्टी घडत आहेत. याप्रकरणी तपासासाठी मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेनं क्वारन्टाइन केलं आहे.

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची चौकशीही मुंबई पोलिसांकडून करण्यात आली. मात्र सुशांतच्या वडिलांनी सुशांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्याविरोधात पाटणा पोलिसात तक्रार दिल्यानंतर याप्रकरणात बिहार पोलिसांचीही एण्ट्री झाली आहे.

दरम्यान, तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना (Bihar police) मुंबई पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. कारण मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांच्या टीमला कोणतंही वाहन उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. तसंच त्यांच्या सुरक्षेसाठीही काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बिहार पोलिसांवर रिक्षाने फिरण्याची वेळ आली.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलीस आणखी एका चित्रपट दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले. रिया आणि सुशांत यांच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल या दिग्दर्शकाने यापूर्वीसुद्धा वक्तव्य केलं होतं. सुशांतच्या रॉम कॉम चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी (Rumi Jaffery) यांच्या मुंबईच्या घरात बिहार पोलीसांनी चौकशीसाठी हजेरी लावली.

रुमी जाफरी यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी काही मोठे खुलासे केले होते. विशषतः रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्या नात्याविषयी रुमीने वक्तव्य केलं होतं. रुमी म्हणाले होते, "सुशांत आणि रिया एकमेकांबरोबर खूश होते. लवकरच त्या दोघांच्या एकत्रित चित्रपटाला सुरुवात होणार होती आणि मेमध्ये शूटिंगच्या तारखा होत्या. पण Coronavirus च्या भीतीने शूटिंग पुढे ढकललं होतं."

Published by: Akshay Shitole
First published: August 3, 2020, 12:23 AM IST

ताज्या बातम्या