Home /News /entertainment /

IPL 2022 : श्रेयस तळपदेचा राजस्थान रॉयल्सला पाठिंबा, स्टेडिअमधील गुलाबी जर्शीतील Video Viral

IPL 2022 : श्रेयस तळपदेचा राजस्थान रॉयल्सला पाठिंबा, स्टेडिअमधील गुलाबी जर्शीतील Video Viral

IPL 2022 : श्रेयस तळपदे (Shreyas Talpade ) देखील आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्या पत्नीसह स्टेडियमध्ये आला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  मुंबई, 2 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) कोलकाता नाईट रायडर्सचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध (KKR vs RR) होत आहे. या सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. अनेक सेलेब्स आपल्या आवडत्या टीमला पाठींबा देण्यासाठी येत असतात. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे  (Shreyas Talpade ) देखील आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आपल्या पत्नीसह स्टेडियमध्ये आला आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करण्यासाठी अभिनेता श्रेयस तळपदे आज सामना पाहण्यासाठी चक्क स्टेडिअमध्ये आला आहे. यावेळी तो राजस्थान रॉयल्सच्या पिंक रंगाच्या जर्शीमध्ये दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी दीप्ती आणि काही मित्र मंडळी देखील दिसली. सर्वजण राजस्थान रॉयल्सला प्रोत्साहन देताना दिसली. या व्हिडिओमध्ये श्रेयस तळपदे म्हणताना दिसत आहे की, विश्वास ठेवा किंवा नका पण मी पहिल्यांदाच मॅच पाहायला आलो आहे..असं म्हणत तो त्याच्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहे. श्रेयस तळपदेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा-मराठीतील 'बाहुबली' दिसणार मधुर भंडारकरांच्या सिनेमात, साकरणार महत्त्वपूर्ण भूमिक अभिनेता श्रेयस तळपदे सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशची भूमिका साकारताना दिसत आहे. यशच्या भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. मराठीसह श्रेयस तळपदेनं बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच ठसा उमठविला आहे. श्रेयसनं सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी झाला देखील. आयुष्यात चढ उतार आल्याचं श्रेयस अनेकदा सांगतो. वीसहून अधिक वर्षे तो या क्षेत्रात काम करतोय. निर्मिती, दिग्दर्शक तसंच वॉइस ओव्हर यांसारख्या अनेक क्षेत्रात त्यानं काम केलं आहे.
  राजस्थान विरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने टॉस जिंकून कोलकातासाठी प्रथम गोलंदाजी निवडली. त्याचा हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज उमेश यादवने सुरूवातीचा सार्थ ठरवला. सामन्याच्या सलामीपासूनच भेदक मारा करत त्याने धावांवर अंकुश लावला. त्यामुळे तिसऱ्या षटकात धावा जमवण्याच्या गडबडीत राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का बसला. देवदत्त पडिक्कलचा (२ धावा) उमेश यादवने टिपलेला हा झेल विशेष चर्चेत राहिला.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Ipl 2022, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या