मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या केल्यामुळे बॉलिवूडनगरीपासून ते राजकीय नेत्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस अधिकारी सुशांतच्या घराच्या तपासणी करत आहे. प्राथमिक तपासात नवीन माहिती समोर आली आहे.
आज दुपारी सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. मित्रांसोबत दिवस घालवण्यानंतर दुपारी तो आपल्या खोलीत गेला, तो परत आलाच नाही. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुशांतच्या घरी धाव घेतली.
पडद्यावर हूबेहूब धोनी साकारणाऱ्या सुशांतचा हा VIDEO होत आहे VIRAL
पोलिसांनी सुशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली, असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
पोलिसांनी सुशांतचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. गेल्या काही तासांत सुशांत कुणासोबत बोलला, कुणाला त्याने कोणते कोणते मॅसेज केले, याचा तपास सध्या सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागद पत्र आढळून आली आहे.
डिप्रेशनमध्ये होता सुशांत; Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची नुकतीच झाली एंगेजमेंटआठवड्यभरापूर्वी झाली होती एक पार्टी
काही दिवसांपूर्वी मुंबईतच एक मोठी पार्टी झाली होती. या पार्टीत सुशांत हजर होता. याच पार्टीत त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलियन सुद्धा होती. ही पार्टी झाल्यानंतर आठवड्यापूर्वी सुशांतची दिशा सॅलियन हिने तिच्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.
दिशा सॅलियनने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासाचा एक भाग म्हणून या पार्टीमध्ये जे कुणी सहभागी होते, त्या सर्वांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे.
दिशाच्या आत्महत्येमुळे सुशांतने Tweet करून भावना व्यक्त केल्या होत्या. 'दिशाची बातमी हादरवून टाकणारी आहे. तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला माझ्याकडून भावपूर्ण सांत्वन', असं त्यानं लिहिलं होतं.
दरम्यान, गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं.
सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.