Exclusive : रणवीरची कोणाला माहीत नसलेली गोष्ट सांगतेय 'गली बाॅय'मधली त्याची आई

Exclusive : रणवीरची कोणाला माहीत नसलेली गोष्ट सांगतेय 'गली बाॅय'मधली त्याची आई

गली बाॅयमध्ये अमृता सुभाष रणवीरची आई बनलीय. त्यानिमित्तानं अमृता सुभाषनं News18Lokmat.comशी खास Exclisive बातचीत केलीय.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी : रणवीर सिंगच्या गली बाॅय सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यात एका अभिनेत्रीनं लक्ष वेधून घेतलंय, ती म्हणजे अमृता सुभाष. गली बाॅयमध्ये अमृता रणवीरची आई बनलीय. आता जे हिप हाॅप गाणं रिलीज झालंय, त्यात आईचा उल्लेख आहे. माझ्या आईचं हसू माझं आयुष्य आहे, अशा अर्थाचे शब्द आहेत. अमृता सुभाषनं News18Lokmat.comशी खास Exclisive बातचीत केलीय.

अमृता म्हणाली, 'झोयानं मला पाहिलं तेव्हा तिला शंका आली की मी आईच्या भूमिकत योग्य वाटेन की नाही. पण मी एका मुस्लिम आईची भूमिका करतेय. मुस्लिमांमध्ये 16व्या वर्षी लग्न होतं, 17व्या वर्षी मूल. त्यामुळे मी सुट होईन, हे आम्हा दोघींनाही वाटलं.' गली बाॅयसाठी रणवीरनं वजन कमी केलं, त्यामुळे तोही लहान वाटतो असं अमृता म्हणाली.

अमृताला निवडलं दिग्दर्शिका झोया अख्तरनं. तेही आॅडिशन न घेता तिची निवड झाली. याआधी अमृतानं रमन राघवमध्ये काम केलं होतं. काही हिंदी प्रायोगिक सिनेमेही केले होते. पण मोठं बॅनर असलेला हा अमृताचा पहिलाच सिनेमा.

अमृता आणि रणवीर सिंगची पहिली भेट झाली, ती लूक टेस्टला. सिनेमातले कलाकार एकमेकांबरोबर कसे दिसतात, हे पाहण्यासाठी लूक टेस्ट असते. अमृता रणवीरबद्दल अगदी भरभरून बोलत होती. ' रणवीर म्हणजे स्टारमधला अभिनेता आहे. ते तेच तेच भूमिका परत परत करत नाहीत. पद्मावत असो नाही तर बाजीराव. प्रत्येक भूमिकेत वैविध्य असतं.'

अमृता सांगते, रणवीर स्वत:हूनच म्हणाला, तुझं रमन राघवमधलं काम मला आवडलं. मला आश्चर्यच वाटलं. खूप कमी अभिनेते दुसऱ्या कलाकारांचं काम तांत्रिकदृष्ट्या पारखू शकतात.

सेटवर तर अमृता आणि रणवीरच्या छान गप्पा सुरू असायच्या. पद्मावतबद्दल दोघांचं एकमत झालं. अमृता म्हणाली, जेव्हा कुणी सिनेमात खलनायक साकारतो, तेव्हा त्या अभिनेत्याला त्या खलनायकावर प्रेम करावं लागतं. रणवीरचा खिलजी पाहिला, तर त्याला कधी प्रेमच मिळालं नाही, असं वाटतं. म्हणून तो तसा वागतो. आणि रणवीरचंही तेच मत पडलं. ही भूमिका करण्याआधी रणवीर म्हणाला, मी मनात खिलजीपुढे अनलव्हड लिहिलं होतं.

रणवीर नेहमी धमाल करणारा, म्हणून ओळखला जातो. पण गली बाॅयमध्ये रणवीर शांत दाखवलाय. त्यामुळे सेटवरही तो तसाच होता. त्यानं अमृताला सांगितलं की झोया अख्तरचे सिनेमे आव्हानात्मक वाटतात. कारण ते करताना खूप अंतर्मुख व्हायला होतं.

अमृता सांगते, 'सिनेमात रणवीरच्या धाकट्या भावाची भूमिका करणारा एक मुलगा त्याला म्हणाला की घरातले त्याला सांगतात तू रणवीर सिंग बनायला हवंस. त्यावर रणवीर हसला नाही. थट्टा केली नाही. त्यानं त्याला गंभीरपणे सल्ला दिला. तो म्हणाला, ' तुला माझ्या शुभेच्छा. पण तू नृत्य, अभिनय याचं प्रशिक्षण घे. प्रत्येक भूमिका, डान्स वेगळं करण्याचा प्रयत्न कर. रणवीर हे सगळं सांगत होता, तेव्हा मीही ऐकत बसले होते.'

गली बाॅयमध्ये अमृता सुभाषनं मुस्लिम स्त्री साकारलीय. अमृता नेहमीच कुठलीही भूमिका करताना नीट अभ्यास करते. आताही रझिया करताना अमृता एका मुस्लिम स्त्रीच्या घरी गेली. तिच्या घरामागे एक बाग आहे. तिथे मुस्लिम बायका येऊन बसतात. तिथे एका तरुण स्त्रीच्या घरी ती गेली. तिथे गेल्यावर दुसऱ्या लग्नाबद्दल तिनं नुसता विषय काढला. तेव्हा तिची सासू ओरडून म्हणाली, असं कसं होणार? हल्ली कायदे बदललेत. लगेच पोलिसात जायला हवं.

हे अमृतानं झोयाला सांगितलं आणि तिथेच ती रझिया गवसली. अमृता म्हणते अन्याय सहन करावा लागणाऱ्या स्त्रीमध्ये झोयानं अंगार दिला.

गली बाॅय 14 फेब्रुवारीला रिलीज होतेय. सिनेमात अमृताची आई ज्योती सुभाष तिच्या सासूच्या भूमिकेत आहेत. तिच्या आईनंच तिच्या खाष्ट सासूची भूमिका केलीय. रणवीरची आई बनलेल्या अमृताला पाहायला तिचे फॅन्स उत्सुक आहेत.

First published: January 5, 2019, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading