मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'मायरासारख्या भावना अनेकांच्या असू शकतात, म्हणून ती आवडते'

'मायरासारख्या भावना अनेकांच्या असू शकतात, म्हणून ती आवडते'

मला स्वत:ला विक्रांतसारखा वयानं मोठा जोडीदार चालणार नाही. मी नाही प्रेमात पडू शकणार. मी मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे मला थोडा चाइल्डिश असा, खेळकर असा जोडीदार चालेल. मायराची भूमिका करणारी अभिज्ञा भावे सांगते. अजूनही तिनं खूप गोष्टी शेअर केल्यात.

पुढे वाचा ...

    मुंबई, 28 नोव्हेंबर : सध्या 'तुला पाहते रेमधली नकारात्मक व्यक्तिरेखा मायरा भलतीच लोकप्रिय होतेय. तिची बाॅडी लँग्वेज, स्टाइल सगळ्यांना आवडतेय. एकाच वाहिनीवरची अभिज्ञा भावेची ही दुसरी ग्रे शेड असलेली भूमिका. त्याबद्दलच जाणून घेण्यासाठी आम्ही तिला गाठलं.

    ' खुलता कळी खुलेनामध्ये मोनिका साकारल्यानंतर मला एक ब्रेक हवा होता. म्हणून मी झी युवावरच्या कट्टीबट्टी मालिकेत छोटीशी भूमिका केली होती, ' अभिज्ञा सांगते. ' मला मायराबद्दल विचारलं, तेव्हा मी लगेच हो म्हटलं. कारण सुबोधदादा आणि झी मराठी हे डेडली काॅम्बिनेशन मला आवडलं, म्हणून मी ही मालिका स्वीकारली. '

    मोनिका आणि मायरा वेगळं कसं करायचं याचा अभिज्ञा विचार करत होतीच. ' लोकांसाठी नकारात्मक भूमिका ही नकारात्मकच असते. पहिली भूमिका इतकी लोकांच्या मनात बसली होती की मायरामधलं वेगळेपण मला दाखवायचंच होतं.'

    अभिज्ञा मायराबद्दल सांगत होती, 'मायरा कामात परफेक्ट आहे. ती सेल्फमेड आहे. मेहनती आहे. विक्रांतवर तिचं प्रेम असलं तरी कामात ती चोख आहे. तिच्यामुळे कंपनीला नुकसान झालं तर ती त्याची भरपाईही करतेय. ती आयतं खात नाही. ती एथिकल आहे. तिनं विक्रांतच्या प्रगतीत स्वत:ची प्रगती पाहिलीय. त्यामुळे आताची तिची रिअॅक्शनही स्वाभाविक आहे.' अभिज्ञा या मायराला फार जवळून ओळखते, असंच वाटत होतं.

    हल्ली नायक-नायिकांप्रमाणे खलनायिकाही लोकप्रिय होतायत. त्याबद्दल अभिज्ञाला काय वाटतं? ' मला याचं आश्चर्य वाटतं. पण अनेकदा यामागची प्रेक्षकांची भावनाही समजून घेता येते. बऱ्याचदा आपल्यालाही अशा भावनांतून जावं लागतं. पण आपण व्यक्त होऊ शकत नाही. मग अशा वेळी मायरासारखी व्यक्तिरेखा आवडायला लागते. कारण ती एक्सप्रेस होतेय. '

    अभिज्ञाला बाहेर गेल्यावरही लोकांचं कौतुक मिळतंच. लोक ट्रोलही करतात. नकारात्मक भूमिका काळाप्रमाणे चालते, असं अभिज्ञा म्हणते. पण अभिज्ञा विक्रांत-ईशाच्या नात्याकडे कसं पाहते?

    'विक्रांत-ईशासारखं प्रेम असू शकतं. अनेक मुलींना फादर फिगर जोडीदार हवा असतो. आपल्या आजूबाजूला अशी उदाहरणं आहेत. पण मला स्वत:ला विक्रांतसारखा वयानं मोठा जोडीदार चालणार नाही. मी नाही प्रेमात पडू शकणार. मी मॅच्युअर्ड आहे. त्यामुळे मला थोडा चाइल्डिश असा, खेळकर असा जोडीदार चालेल. माझ्याएवढाच मॅच्युअर व्यक्ती माझ्या आयुष्यात आला तर बोअरिंग होईल. पण विक्रांत-ईशाच्या प्रेमाला मी सपोर्ट करते.'

    आधी मोनिका, आता मायरा...अभिज्ञा भावे आपली भूमिका चोख करतेय आणि एंजाॅयही करतेय.

    दीपवीरचं आज मुंबईत रिसेप्शन,या आहेत खास गोष्टी

    First published:

    Tags: Abhidnya bhave, Isha, Mayara, Subodh bhave, Tula pahate re, Vikrant saranjame