मुंबई, 10 डिसेंबर: सोशल मीडियावरचा (Social Media) एखादा व्हिडिओ (Video) लोकांना आवडला, की तो वेगाने व्हायरल (Viral Video) होत असल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. सध्या एका तरुणीने केलेल्या भरतनाट्यम (Bharatanatyam) नृत्याचा व्हिडिओ असाच खूप व्हायरल झाला आहे. त्यात तिने केलेला पदन्यास (Dance Steps) इतका बहारदार आहे, की ते पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक होत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही नक्की कौतुक कराल.
सात डिसेंबरला शेअर केलेला हा व्हिडिओ ट्विटरवर आतापर्यंत दीड लाखाहून अधिक जणांनी (Video Views) पाहिला आहे. 14 हजारांहून अधिक लाइक्स (Likes) व्हिडीओला मिळाले असून, हजारहून अधिक कॉमेंट्स त्यावर आल्या आहेत. या व्हिडीओत ती घराच्या बाहेर व्हरांड्यात भरतनाट्यम नृत्य करत असताना दिसत आहे. तिने परिधान केलेली खास साडी, तिची केशरचना, एक्स्प्रेशन्स (Expressions), तसंच तिची नृत्यनिपुणता यांचं कौतुक व्हिडिओ पाहणाऱ्यांकडून केलं जात आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
या तरुणीचं नाव रुक्मिणी विजयकुमार (Rukmini Vijaykumar) असं असून, ती भरतनाट्यम डान्सर (Dancer) आणि अभिनेत्री (Actress) आहे. रुक्मिणीने तमीळ चित्रपटांमध्ये (Tamil Films) काम केलं आहे. ती इन्स्टाग्रामवर (Instagram) विशेष नेहमीच सक्रीय असते आणि तिथे तिचे साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स (Followers) आहेत.
Who followed me after dis video :
1. I dont post anything political
2. Just random cringe posts
3. If u guys still wanna follow den welcum 🙂 if not den can unfollow ..no worries 😆😆✌️ https://t.co/sEdsz1SqNP
— vaidehi singh (@vaidehi_sing) December 9, 2020
आठ वर्षांची असताना रुक्मिणीने भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं होतं. रुक्मिणी भरतनाट्यम नृत्य स्वतः तर करतेच; शिवाय या नृत्याचं प्रशिक्षणही देते. भारतीय शास्त्रीय नृत्य आणि त्यातही खासकरून भरतनाट्यम नृत्याचं शिक्षण देण्याची ‘राधा कल्प’ ही पद्धत रुक्मिणीने सुरू केली आहे. गुरू नर्मदा, गुरू पद्मिनी राव आणि गुरू सुंदरी संथानम यांच्याकडून रुक्मिणीने भरतनाट्यम नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. पारंपरिक भारतीय नृत्यासोबतच तिने आधुनिक नृत्याचं शिक्षणही घेतलं आहे. बॉस्टनमधल्या बॉस्टन काँझर्व्हेटरी (Boston) या संस्थेत रुक्मिणीने बॅले आणि आधुनिक नृत्य या विषयांमध्ये बीएफए ही पदवी संपादन केली आहे. तसंच, लॉस अँजेलिसमधल्या न्यूयॉर्क फिल्म ॲकॅडमीमध्ये तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, तसंच बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून तिने फिटनेस ट्रेनिंगबद्दलचं शिक्षणही घेतलं आहे. कोचायदान या रजनीकांतच्या (Rajinikanth) गाजलेल्या चित्रपटात तिने रजनीकांतच्या बहिणीची भूमिका केली होती.