प्रिया वारियरची आयपीएलमध्ये एंट्री, 'या' टीमसोबत दिसणार

ती आपल्याला 'मंच चॉकलेट' या ब्राँडचे प्रमोशन करताना आयपीएलमध्ये पाहाण्यास मिळणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2018 11:30 PM IST

प्रिया वारियरची आयपीएलमध्ये एंट्री, 'या' टीमसोबत दिसणार

11 एप्रिल : आपल्या अदाने सर्वांना घायाळ करणारी प्रिया वारियर आता  आयपीयल 2018 मध्ये सहभागी होणार आहे. ती एका खेळाडूसोबत पाहण्यास मिळणार आहे.

मल्याळम अभिनेत्री प्रिया वारियरने आपल्या अदाकारीने सपूंर्ण भारतीय तरुणाईला घायळ केलं होतं. आता ती आयपीएलचा सुद्धा भाग होणार आहे, ती आपल्याला 'मंच चॉकलेट' या ब्राँडचे प्रमोशन करताना आयपीएलमध्ये पाहाण्यास मिळणार आहे.

मंच चॉकलेट या ब्राँडने आयपीएल 2018 मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांना आपल्या ब्राँडचे 'क्रंच पार्टनर' बनवलं आहे आणि 'माइटी20' नावाचे स्पेशल कॅम्पेन सुरू केले आहे. या ब्राँडच्या प्रमोशनसाठी प्रिया वारियरला साईन केले आहे.

 कोण आहे  प्रिया वारियर ?

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर  ही 18 वर्षांची आहे. प्रिया त्रिपुरा, केरळची रहिवासी आहे. आजकाल ती त्रिपुराच्या विमला कॉलेजमध्ये बी कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.  सोशल मीडियावर आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या 'उरु आदर लव्ह' या चित्रपटाच्या एका व्हिडिओमुळे तीने धुमाकूळ घातला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2018 11:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...