• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • टीव्ही अभिनेत्याची ऑनलाईन फसवणूक; दारुचं आमिष दाखवत हजारोंचा गंडा

टीव्ही अभिनेत्याची ऑनलाईन फसवणूक; दारुचं आमिष दाखवत हजारोंचा गंडा

संजयनं एक दारुची बाटली ऑनलाईन ऑर्डर केली होती. या व्यवहारात त्याला 9 हजार रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई 28 जून: इंटरनेट ही दुधारी तलवार आहे असं म्हटलं जातं. इंटरनेटचे जसे फायदे आहेत. तसेच कालांतरानं काही तोटे देखील जाणवू लागले आहेत. अन् त्यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे ऑनलाईन फ्रॉड. (Internet fraud) सर्वसामान्य लोकांपासून अगदी नामांकित सेलिब्रिटिंपर्यंत अनेकांसोबत ऑनलाईन फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. या यादीत आता ‘कुंडली भाग्य’ (Kundali Bhagya) फेम संजय गगनानी (Sanjay Gagnani) याचं देखील नाव जोडलं गेलं आहे. संजयनं एक दारुची बाटली ऑनलाईन ऑर्डर केली होती. या व्यवहारात त्याला 9 हजार रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. गोपी बहु संस्कार विसरली का? बेली डान्समुळं देवोलिना होतेय ट्रोल बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत संजयनं हा धक्कादायक अनुभव सांगितला. त्याला एक ऑनलाईन नंबर मिळाला होता. त्यावर दारुच्या बाटलीची जाहिरात होती. ती जाहिरात पाहून मी ऑनलाईन ऑर्डर दिली. परंतु पेमेंट केल्याशिवाय ऑर्डर स्विकारली जाणार नाही अशी माहिती त्याला समोरुन मिळाली. त्यानंतर त्यांच्या सांगण्यानुसार त्यानं 9 हजार रुपये ऑनलाईन सेंड केले. इगतपुरी रेव्ह पार्टीत अटक झालेली हिना पांचाळ नेमकी कोण आहे?, जाणून घ्या मात्र तरी देखील त्याची ऑर्डर स्विकारली जात नव्हती. त्याच्याकडून आणखी 17 हजार रुपये मागितले जात होते. हे पैसे होम डिलिव्हरीनंतर परत मिळतील असं आश्वासन त्याला दिलं जात होतं. परंतु असा प्रकार कुठलीही कंपनी करत नाही. त्यामुळं त्याला संशय आला. अन् त्यानं ते पैसे देण्यास नकार दिला. परिणामी त्यांनी ऑर्डर पाठवण्यास नकार दिला. अन् आता तर त्या नंबरवर कोणीही फोन देखील उचलत नाही असा अनुभव संजयनं सांगितला. सध्या त्यानं या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: