मुंबई, 21 जून : आज आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं बॉलिवूड कलाकारामध्येही सक्रियता पहायला मिळाली. शिल्पा शेट्टी ते बिपाशा बासु, अनुपम खेर आणि ट्विंकल खन्ना पर्यंत सर्वांनीच योग दिनानिमित्त त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. या सर्वात अभिनेता सलमान खान सुद्धा मागे नाही. मात्र सलमाननं नेहमी प्रमाणेच त्याच्या हटके स्टाइलमध्ये आणि थोड्या अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा केला. याचा व्हिडिओ त्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. सलमानचा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांचा चांगलाच पसंतीत उतरलेला दिसत आहे.
या टीव्ही अभिनेत्रीला करावा लागला लाजिरवाण्या क्षणाचा सामना, ऐनवेळी ड्रेसने दिला
आपल्या सिनेमांमध्येही स्टंटना महत्त्व देणाऱ्या दबंग खाननं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानंही असंच काहीसं केलं. सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तो पाण्यामध्ये रिव्हर्स डाइव्ह मारताना दिसत आहे. खरं तर अशाप्रकारे रिव्हर्स डाइव्ह मारणं सामान्यतः सोपं नसतं मात्र सलमानच्या फिटनेसची बातच काही और आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही त्यांचा फिटनेस भल्याभल्यांना मात देणारा आहे. सलमान आजही त्याच्या फिटनेसमुळे आजकालच्या सर्व नव्या अभिनेत्यावर भारी पडताना दिसतो.
बिपाशाच्या बोल्ड फोटोवर रणवीरची अशी कमेंट, दीपिकानं स्वप्नातही केला नसेल विचार
View this post on Instagram
मागच्या काही दिवसांपासून सलमान त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचे वर्कआउट करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहे. मात्र त्याच्या या व्हिडिओनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या या व्हिडिओचं आणि विशेषता त्याच्या फिटनेसचं त्याचे चाहते कौतुक करत आहे. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या त्याच्या ‘भारत’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. हा सिनेमा 200 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या आधी आलेला त्याचा ‘ट्यूबलाइट’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यामुळे ‘भारत’च्या यशानं सलमान सध्या खूप खुश असल्याचं पाहायला मिळत आहे.
या टीव्ही अभिनेत्रीला करावा लागला लाजिरवाण्या क्षणाचा सामना, ऐनवेळी ड्रेसने दिला
View this post on Instagram
===========================================================
VIDEO : बिचुकले पुन्हा जाणार का बिग बाॅसच्या घरात? सई आणि मेघाचा खुलासा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा