Home /News /entertainment /

अभिमानास्पद! या भारतीय वेबसीरिजने पटकावला International Emmy Award 2020

अभिमानास्पद! या भारतीय वेबसीरिजने पटकावला International Emmy Award 2020

वेब सीरिज 'दिल्ली क्राइम' (Delhi Crime) ड्रामा कॅटेगरीमध्ये आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2020 (International Emmy Award 2020) पटकावला आहे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर: भारतीय मनोरंजन क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी घटना सोमवारी 23 नोव्हेंबर 2020 रोजी घडली आहे. वेब सीरिज 'दिल्ली क्राइम' (Delhi Crime) ड्रामा कॅटेगरीमध्ये आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2020 (International Emmy Award 2020) पटकावला आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर भारतातील एखाद्या कामाचा अशाप्रकार सन्मान होणे हे अत्यंत अभिमानास्पद आहे, अशा प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) यावर्षीचा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा व्हर्च्यूअल फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता. रिचर्ड काइंडने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 2012 साली दिल्लीमध्ये झालेल्या गँगरेप आणि हत्या या घृणास्पद घटनेवर आधारित ही वेबसीरिज आहे. नेटफ्लिक्स (Netflix) वर ही सीरिज प्रदर्शित झाल्याने त्यातील कलाकारांनी, दिग्दर्शक, लेखकांनी प्रेक्षकांकडून पसंती मिळवली होती. (हे वाचा-किडनी फेल झाल्यामुळे प्रसिद्ध TV कलाकाराचा मृत्यू, आर्थिक मदतीचं केलं होतं आवाहन) या वेबसीरिजमध्ये शेफाली शाह (Shefali Shah) यांच्याबरोबरच राजेश तैलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, यशस्विनी दयामा, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोड़ा, सिद्धार्थ भारद्वाज यांसारखे मुरलेले कलाकार पाहायला मिळाले. शेफाली शाह यांनी या सीरिजमध्ये डेप्यूटी कमिशनर वर्तिका चतुर्वेदी यांची भूमिका साकारली आहे. भारतीय-कॅनडियन दिग्दर्शक रिची मेहता यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. (हे वाचा-'4 वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न', 'काय पो छे'मधील सुशांतच्या सहकलाकाराचा खुलासा) दरम्यान सीरिजच्या या यशानंतर अनेकांनी ट्वीट करून सर्वांचे कौतुक केले आहे, तर कलाकारांनी देखील त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. शेफाली शाह यांनी देखील 'OMGGGGGGGGGGGG OMGGGGGGGGGGGG OMGGGGGGGGGGGG' अशा शब्दात त्यांना झालेला आनंद मांडला आहे. मालिकेतील सर्व कलाकारांना देखील त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केलं आहे. अदिल हुसैन यांनी देखील याबाबत ट्वीट केले आहे. या सीरिजमध्ये 23 वर्षीय फिजिओथेरपी इन्टर्नबाबतीत घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. 16 डिसेंबर 2012 रोजी या मुलीचे अपहरण करुन चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली होती. व्हर्च्यूअल कार्यक्रमात हा पुरस्कार स्विकारताना मेहता यांनी केलेल्या भाषणादरम्यान सर्व महिलांना हा सन्मान समर्पित केला. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी आणखी दोन भारतीय नामांकनं होती. फोर मोअर शॉट्स प्लीज या सीरिजला 'सर्वोत्कृष्ट कॉमेडी'साठी तर मेड इन हेवनमधील अर्जून माथूरच्या भूमिकेला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' यासाठी नामांकन मिळालं होतं. हृतिक रोशन, विद्या बालन, कुब्रा सैट, अर्जून माथूर अशा अनेक कलाकारांनी विजेत्या भारतीय वेब सीरिजमधील कलाकारांचे अभिनंदन केलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Delhi, Gang Rape, Netflix

    पुढील बातम्या