मुंबई, 05 फेब्रुवारी: बॉलिवूड आणि दक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री (Bollywood actress) पूजा हेगडेनं (Pooja Hegde) तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिला सोशल मीडियावर लाखो युजर्स फॉलो करत आहेत. या चाहत्यांना तिचे फोटो आणि व्हिडीओला पसंत पडतात. पण काही वेळा या कलाकारांना काही विचित्र आणि विक्षिप्त प्रकारांना सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रकार पूजा हेगडेसोबत घडला आहे. ज्यामध्ये तिच्या एका फॉलोअरने तिला Naked Photo मागितला आहे. पूजा हेगडेनं या युजरला एक कडक रिप्लाय देत त्याची बोलती बंद केली आहे.
अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती तिचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अलीकडेच तिने काही Unseen फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंना पाहून एका युजरने तिला Naked Photos ची मागणी केली.
(हे वाचा-जगातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज: IMDB च्या रेटिंगनुसार या आहेत Top 5 OTT मालिका)
सोशल मीडिया युजरकडून अशी मागणी केल्यानंतर अनेकदा या अभिनेत्री त्याकडे कानाडोळा करतात किंवा संतापून कठोर शब्दांत कानउघडणी करतात. पण अभिनेत्री पूजा हेगडे मात्र याला अपवाद ठरली तिने या युजरला अनोख्या पद्धतीनं आणि उपहासात्मक चपराक दिली आहे.
या युजरती कमेंट वाचून पूजाने तिच्या पायांचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला अपलोड केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'नंगे पाव'. हा फोटो शेअर करून तिने त्या इन्स्टाग्राम युजरची बोलती बंद केली आहे. तिच्या या पोस्टनंतर अनेकांना समजलं की, ज्या युजरने तिला Naked Photo ची मागणी केली होती, त्याला अनोख्या पद्धतीनं तिला दिलेलं हे एक उत्तर होतं.
प्रकरण नेमकं काय आहे?
खरंतर पूजा हेगडेनं आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी 'Post a Photo' या ट्रेन्डमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी चाहत्यांच्या मागणीवरुन तिने अनेक प्रकारचे फोटो शेअर केले होते. याचवेळी एका वापरकर्त्याने तिला Naked Photo ची अजब मागणी केली.
(हे वाचा-सलमान खानपेक्षा हा अभिनेता खऱ्या अर्थानं ठरला कतरिना कैफचा गॉडफादर)
युजरच्या या मागणीमुळे पूजा नाराज नाही झाली. तिने अनोख्या पद्धतीने या वापरकर्त्याची मागणी पूर्ण केली. तिने त्वरित तिच्या पायाचा फोचो शेअर केला आणि 'नंगे पाव' असं कॅप्शन दिलं. अशा पद्धतीने तिने दिलेल्या उत्तराचं अनेक चाहते कौतुक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress