Home /News /entertainment /

सनई-चौघडे वाजणार! 'या' खास व्यक्तीमुळे कंगनानं सुरू केली लग्नाची तयारी

सनई-चौघडे वाजणार! 'या' खास व्यक्तीमुळे कंगनानं सुरू केली लग्नाची तयारी

'ही' व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या 'पंगा' सिनेमाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीचा पती नितेश तिवारी आहे.

  मुंबई, 09 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिचा आगामी सिनेमा ‘पंगा’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण आता तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे कंगनानं आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीमुळे कंगना लग्न करण्यासाठी तयार झाली आहे ती व्यक्ती स्वतः विवाहित आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं ती लवकरच लग्न करणार असल्याचा खुलासा केला आहे. कंगनानं मुलाखतीत केलेल्या खुलाशावरुन तर सर्वांनाच वाटेल कंगनाला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मिळाला आहे. पण असं काही नाही आहे. कंगनाला ज्या व्यक्तीनं लग्न करण्यासाठी तयार केलं आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिच्या पंगा सिनेमाच्या दिग्दर्शिक अश्विनी अय्यर तिवारीचा पती नितेश तिवारी आहे. अ‍ॅसिड हल्ला..5 वर्षं..54 शस्त्रक्रिया.. या कारणासाठी कंगनाचा दीपिकाला पाठिंबा
   
  View this post on Instagram
   

  "Happy Diwali Everyone" May God give you good health and abundant peace of mind.

  A post shared by Nitesh Tiwari (@niteshtiwari22) on

  डेक्कन क्रोनीकलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कंगनानं ती लग्नासाठी तयार असल्याचा खुलासा केला. ती म्हणाली, खरं सांगायचं तर मला नेहमीच असं वाटायचं की आपल्या योग्यतेची व्यक्ती शोधणं खरंच खूप कठिण असतं. पण जेव्हा मी नितेश तिवारी यांना भेटले त्यावेळी त्याच्या वैवाहिक जीवनातलं प्रेम आणि समजूतदारपणा पाहिल्यावर लग्नाबाबतचे माझे विचार बदलले. ते त्यांच्या पत्नीला नेहमीच पाठिंबा देतात. यावरुन मला वाटतं की मलाही अशी व्यक्ती मिळेल आणि मी आता लग्न करु शकते. जुनं ते सोनं! अभिनेत्रींमध्ये वाढतोय चमचमत्या ड्रेसचा ट्रेंड
  कंगना रणौतचा सिनेमा ‘पंगा’ 24 जानेवारी 2020 ला रिलीज होत आहे. पण त्यासोबतच 26 जानेवारीला वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्ट्रीट डान्सर 3डी’ हा सिनेमा रिलीज होत आहे त्यामुळे या दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘पंगा’मध्ये ऋचा चढ्ढा, नीना गुप्ता,जस्सी गिल आणि पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
  कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ‘पंगा’नंतर तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक थलायवी सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 26 जून 2020 ला रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी कंगनानं प्रचंड मेहनत घेतली असून हा सिनेमा हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगूमध्येही रिलीज होणार आहे. #BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge; दीपिकाच्या अडचणी वाढल्या
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kangana ranaut

  पुढील बातम्या