मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /भारतातील पहिल्या स्टंटवुमन; त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार झाल्या सुपरस्टार

भारतातील पहिल्या स्टंटवुमन; त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार झाल्या सुपरस्टार

आज या अष्टपैलू अभिनेत्रीचा 104 वा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार यांच्या करिअरची दिशा बदलली होती.

आज या अष्टपैलू अभिनेत्रीचा 104 वा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार यांच्या करिअरची दिशा बदलली होती.

आज या अष्टपैलू अभिनेत्रीचा 104 वा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार यांच्या करिअरची दिशा बदलली होती.

मुंबई 18 एप्रिल: ललिता पवार (Lalita Pawar) या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. अगदी हिरोसोबत रोमान्स करणारी प्रेयसी, खलनायिका ते कठोर आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी अगदी सहजगतीनं साकारल्या आहेत. त्यांचा खलनायिका अवतार पाहून काही जणांनी त्यांना शिव्या देखील घातल्या होत्या. (Queen of negative characters) परंतु हिच माझ्या कामाची पोचपावती असं म्हणत त्यांनी कुठलीही तक्रार न करता त्या स्विकाल्या. आज या अष्टपैलू अभिनेत्रीचा 104 वा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या एका कानाखालीमुळं ललिता पवार यांच्या करिअरची दिशा बदलली होती.

ललिता पवार (Lalita Pawar Success Stories) यांचा जन्म 18 एप्रिल 1916 रोजी नाशिकमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याकाळी स्त्रियांना फारसं शिक्षण दिलं जात नव्हतं. परंतु ललिता यांचे वडील पाश्चात्य विचारांनी प्रेरित होते. त्यामुळं त्यांनी हवं ते शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं. किंबहूना त्यांच्या प्रोत्साहनामुळंच त्यांनी अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ज्या काळात चित्रपट केवळ मुकपटाच्या रुपात यायचे तेव्हापासून त्या कार्यरत आहेत. पुढे त्यांनी ‘श्री ४२९’, ‘अनाडी’, ‘हम दोनों’, ‘आनंद’, ‘नसीब’, ‘दुसरी सीता’, ‘काली घटा’ यांसारख्या शेकडो मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं. अन् याच दरम्यान अशी एक घटना घडली की ज्यामुळं त्यांचं करिअर देखील संपलं असतं.

अवश्य पाहा - ये फिटनेस की बात है.... अभिनेत्रीनं समुद्रकिनारी केला हॉट योगा

1942 मध्ये आलेल्या ‘जंग-ए-आझादी’ या चित्रपटाच्या सेटवर एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान, भगवान दादा यांना त्यांच्या कानाखाली मारायची होती. या दृश्यादरम्यान भगवान दादा यांनी जोरात कानाखाली मारली ज्यामुळे त्या खालीच कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त वाहू लागलं. यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता पवार यांच्यावर तीन वर्ष उपचार सुरु होते. त्या बऱ्या तर झाल्या पण लकव्यामुळे त्यांना डावा डोळा गमवावा लागला. इतकंच नाही तर त्यांचा चेहराही कायमचा बिघडला. डोळा खराब झाल्यामुळं ललिता पवार यांचं हिरोईन होण्याचं स्वप्न कायमचं तुटलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खलनायिकेंच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. अन् या भूमिका त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे साकारल्या की खऱ्या खुऱ्या आयुष्यातही त्या इतक्याच दुष्ट आहेत की काय? अशी शंका प्रेक्षक घेऊ लागले. यावरुनच त्यांच्या अभिनय कौशल्याचा अंदाज येतो. पुढे त्यांनी जवळपास 700 चित्रपटांमध्ये काम केलं. करिअरच्या उत्तरार्धात त्यांना कर्करोग आणि स्मृतीभ्रंश झाला. अन् उपचारादरम्यान 24 फेब्रुवारी 1998 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment