Year Ender 2018 : इंजिनियर असलेल्या गायत्री दातारला करायचा आहे 'हा' ड्रीमरोल!

2018नं छोट्या पडद्याला बरंच काही दिलंय. अनेक नवे चेहरे लोकप्रिय झाले. त्यापैकी ईशा निमकर साकारणारी गायत्री दातार. गायत्री स्वत: इंजिनियर आहे. पण तिला करियर करायचंय ते अभिनयातच. जाणून घेऊ गायत्रीबद्दल

  • Share this:

सध्या 'तुला पाहते रे' मालिकेतली ईशा घराघरात पोचलीय. तिच्या सुखदु:खाची काळजी प्रेक्षक करायला लागलेत. सुबोध भावेसारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर तोडीस तोड ती अभिनय करते. ईशाची भूमिका साकारणारी गायत्री दातार नक्की आहे कोण, ते जाणून घेऊ.

गायत्री पुण्याची. वडील मर्चंट नेव्हीत तर आई झुआॅलाॅजीची प्राध्यापिका. घरात अभ्यासाचं वातावरण. पण गायत्रीला अभिनयाची आवड निर्माण झाली ती शाळेमुळे.

गायत्री शाळेत नाटकात काम करायची. तिच्या आईनं तिला नाट्य शिबिरातही घातलेलं. तिथंच तिच्यात अभिनयाची बिजं रुजली. शिबिरातच तिला सुबोध भावेच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता.

आता मी अभिनयच करणार, असं तिनं घरी सांगितलं. पण सध्या तू अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असा आईबाबांचा सल्ला होता.

गायत्री दुसरी-तिसरीत असताना रस्त्यावरून अभिनेता अशोक शिंदे जात होता. त्याला गाठून तिनं मला अभिनय करायचाय, पण आई परवानगी देत नाही, असं सांगितलं होतं.

अशोक शिंदेनंही तिला सध्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला सांगितलं. गायत्री शाळा होईपर्यंत शाळेतल्या नाटकांमध्ये काम करायची.

काॅलेजमध्ये मात्र तिनं अभ्यासच केला. इंजिनियरिंगची पदवी घेतली. कम्प्युटर्समध्ये मास्टर केलं.

गायत्रीनं काॅलेजनंतर माऊंटेनियरिंगचा कोर्स केला. तो 28 दिवसांचा होता. त्यावेळीच तिनं स्वत:चा शोध लावला. आपल्याला अभिनयातच रस आहे, हे तिला जाणवलं.

तिनं आईबाबांनाही हे पटवलं. मग सुरू झाली आॅडिशन्सची धावपळ. अनेक आॅडिशन्स देता देता झी मराठीनं तिची निवड केली तुला पाहते रे मालिकेसाठी.

गायत्रीची सुरुवात तर शानदार झालीय. ती ईशा बनून घराघरात पोचलीय. पण गायत्रीचा एक ड्रिम रोलही आहे. तो म्हणजे तिला खलनायिका साकारायचीय. गायत्रीला अभिनयाचा मोठा प्रवास करायचाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 08:07 PM IST

ताज्या बातम्या