16 जून : मधुर भंडारकरनं दिग्दर्शित केलेल्या 'इंदु सरकार'चा ट्रेलर आज (शुक्रवारी) प्रदर्शित झालाय. हा चित्रपट 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
या चित्रपटात नील नितीन मुकेश आणि कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहेत. नील नितीन मुकेश हुबेहुब संजय गांधीसारखा दिसतो. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना काँग्रेसच्या कार्यकाळाची आठवण होते.
हा चित्रपट 1975-77 या आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांवर आधारित आहे. चित्रपटाला संगीत अनु मलिक आणि बप्पी लहरीने दिलंय. कथानक संजय छेल यांनी लिहिलंय. भारताच्या इतिहासातल्या एका राजकीय नाट्यावर बेतलेल्या या सिनेमाकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा