Home /News /entertainment /

पती-पत्नीमध्ये आली ती; 13 वर्षानंतर आणखी एका सेलिब्रिटी जोडप्यानं दिले घटस्फोटाचे संकेत

पती-पत्नीमध्ये आली ती; 13 वर्षानंतर आणखी एका सेलिब्रिटी जोडप्यानं दिले घटस्फोटाचे संकेत

इंद्रनील सेनगुप्ता (Indraneil Sengupta) आणि बरखा बिष्ट (Barkha Bisht) हे जोडपं सध्या यामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे लग्नाला 13 वर्षं होऊन गेल्यानंतर आता त्यांच्यामधले वाद वाढले आहेत.

  मुंबई 24 जुलै : काही दिवसांपूर्वीच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतला करण मेहरा (Karan Mehra) आणि त्याची पत्नी निशा अग्रवाल (Nisha Agarwal) यांच्यामधल्या वादामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. करणने आपल्याला मारहाण आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप निशाने केला होता. या प्रकरणी करण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका टीव्ही कपलमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. इंद्रनील सेनगुप्ता (Indraneil Sengupta) आणि बरखा बिष्ट (Barkha Bisht) हे जोडपं सध्या यामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे लग्नाला 13 वर्षं होऊन गेल्यानंतर आता त्यांच्यामधले वाद वाढले आहेत. इंद्रनील आणि बरखा यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. ई-टाइम्सच्या एका वृत्तानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून हे वाद सुरू आहेत. इंद्रनील सध्या बंगाली अभिनेत्री ईशा साहाला (Isha Saha) डेट करत असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. यामुळेच हे वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. इंद्रनील आणि ईशाने कित्येक बंगाली चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. Video: शिल्पा शेट्टीला चाहत्यांचं समर्थन; घरी फुलं पाठवून दिला धीर
  View this post on Instagram

  A post shared by Barkha (@barkhasengupta)

  इंद्रनील-बरखा आणि इंद्रनीलचे आई-वडील एकाच इमारतीमध्ये राहतात. सध्या इंद्रनील बरखासोबत एका घरामध्ये न राहता, आपल्या आई-वडिलांच्या घरात राहत आहे. त्यांच्यामध्ये सुरू असलेला वाद इंद्रनील-ईशाबाबतच्या अफवांमुळे अधिकच वाढला असल्याचं म्हटलं जात आहे. ‘प्रेमाचं नाटक करून त्यानं फसवलं’; नुपूर सेनननं सांगितला ब्रेकअपचा अनुभव इंद्रनील आणि बरखाच्या लग्नाला १३ वर्षं झाली आहेत. या दोघांना नऊ वर्षांची एक मुलगीही आहे. तिचं नाव मीरा आहे. सध्या ही मुलगी बरखासोबतच राहत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रनील आणि बरखा यांनी सध्या ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या महिन्यातच इंद्रनीलने ईशाबाबतच्या बातम्या म्हणजे अफवा असल्याचं म्हटलं होतं. तसंच, आपला आपल्या पत्नीसोबत कसलाही वाद सुरू नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं होतं. तसंच, ईशानेही या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होते. यापूर्वीही आपलं नाव इतरांसोबत जोडलं गेलं असल्याचं सांगत ईशाने आपण इंद्रनीलला डेट करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यापूर्वी बरखानेही आपण इंद्रनील आणि ईशाबद्दलच्या अफवांना गांभीर्याने घेत नसल्याचं म्हटलं होतं. “इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर अशा अफवा तुमच्या आयुष्याचा भागच बनून जातात. नील आणि मी या सर्व प्रकरणाबाबत एकमेकांशी बोललो आहोत. आम्हाला दोघांनाही या अफवांकडे लक्ष देण्याची गरज नाही. नील आणि माझ्यात कसलेही वाद नाहीत,” असं बरखाने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या