मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एकता कपूर अडचणीत! वेब सीरिजमधून अश्लीलता पसरवल्याचा आरोप, चालणार खटला

एकता कपूर अडचणीत! वेब सीरिजमधून अश्लीलता पसरवल्याचा आरोप, चालणार खटला

निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर (Ekta Kapoor) च्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तिच्याविरोधात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या इंदूर (Indore) मध्ये खटला चालणार आहे.

निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर (Ekta Kapoor) च्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तिच्याविरोधात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या इंदूर (Indore) मध्ये खटला चालणार आहे.

निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर (Ekta Kapoor) च्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तिच्याविरोधात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या इंदूर (Indore) मध्ये खटला चालणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

अरुण कुमार त्रिवेदी, इंदूर, 12 नोव्हेंबर: निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर (Ekta Kapoor) च्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तिच्याविरोधात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या इंदूर (Indore) मध्ये खटला चालणार आहे.  उच्च न्यायालयाने (High Court) एकता कपूरला दिलासा देणारी याचिका फेटाळली आहे.  अश्लील वेब सीरीज (Porn web series) दाखवणे आणि भारतीय सेनेचा अपमान केल्याच्या आरोप करत तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होती. या एफआयआरमध्ये धार्मिक भावना भडकवण्याचा आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केल्याप्रकरणी देखील कलमं लागू करण्यात आली होती. इंदूरमधील अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात एकता विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एकता कपूरला हायकोर्टाच्या इंदूर खंडपीठाकडून दिलासा मिळालेला नाही. इंदूरच्या अन्नपूर्णा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पण, थोडासा दिलासा देत कोर्टाने एफआयआरमधील धार्मिक भावना भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करण्याचे कलम कमी करण्यास सांगितले आहे. इंदूर येथील रहिवासी वाल्मीकि शकरगाए यांनी एकता कपूरविरोधात अन्नपूर्णा पोलिस ठाण्यात 5 जून 2020 रोजी तक्रार दिली.

का करण्यात आली एफआयआर?

एफआयआर मध्ये असे म्हटले आहे की एकताच्या Alt बालाजी या प्लटफॉर्मवर ट्रिपल एक्स वेब सीरिज आहे. यामधून मोठ्या प्रमाणात अश्लीलता पसरवल्याचा आणि भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामधील एका दृश्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, एका पुरुष पात्राने भारतीय लष्कराची वर्दी परिधान केली आहे आणि एक महिला पात्र ती वर्दी फाडते. या तक्रारीवरुन कारवाई करत पोलिसांनी एकताविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यात पोलिसांनी अश्लीलता, धार्मिक भावना भडकवण्याचे आणि राष्ट्रीय चिन्हाचा अवमान करण्याचे कलम लावले होते.

बिग बॉसचा 13 सीझन गाजवणारा हिंदुस्तानी भाऊ (hindustanibhau) याने देखील या वेबसीरिज संदर्भात निर्माती एकता कपूर (ekta kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (shobha kapoor) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊनं केला होता.

First published:

Tags: Web series, मनोरंजन