Home /News /entertainment /

हवाई सुंदरींनी श्रेयस तळपदेला दिलं खास गिफ्ट! रविवारची सकाळ अभिनेत्यासाठी ठरली खास

हवाई सुंदरींनी श्रेयस तळपदेला दिलं खास गिफ्ट! रविवारची सकाळ अभिनेत्यासाठी ठरली खास

हवाई सुंदरींनी श्रेयस तळपदेला दिलं खास गिफ्ट! रविवारची सकाळ अभिनेत्यासाठी ठरली खास

हवाई सुंदरींनी श्रेयस तळपदेला दिलं खास गिफ्ट! रविवारची सकाळ अभिनेत्यासाठी ठरली खास

अभिनेता श्रेयस तळपदेनं नुकताच हवाई प्रवास केला. प्रवासादरम्यान हवाई सुंदरींकडून श्रेयसला खास गिफ्ट मिळालं.

  मुंबई, 27 जून: सध्या माझी तुझी रेशीमगाठ ( Majhi Tujhi Reshimgath) मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) प्रेक्षाकांच्या पसंतीस उतरला आहे. यशच्या रुपातील श्रेयस सध्या प्रेक्षकांना आपलासा  वाटू लागला आहे. अभिनेता श्रेयस तळपदे नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसला आहे.  मराठी त्यानंतर हिंदी सिनसृष्टीत श्रेयसनं त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.  सोशल मीडियावरही श्रेयस प्रचंड सक्रीय असतो.  पुष्पा द राइजमध्ये ( Pushpa The Rise) अल्लू अर्जुनला ( Allu Arjun) दिलेल्या आवाजानंतरच श्रेयसच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्याला भेटण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. श्रेयसला नुकतंच त्याच्या हवाई सुंदरी फॅन्सनी एका खास गिफ्ट दिलं आहे. श्रेयसनं त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रेयस मालिकेच्या शुटींगबरोबरच अनेक कामं करत असतो. त्यामुळे कामानिमित्त अनेकदा त्याचा हवाई प्रवासही ठरलेला असतो. रविवारी कामानिमित्त बाहेर गेलेल्या श्रेयसला खास सप्राइज मिळालं.  इंडिगोच्या ( IndiGo) विमानातून प्रवास करत असतान श्रेयसला त्याच्या फॅन भेटल्या या फॅन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून विमानातील हवाई सुंदरी होत्या त्यांनी श्रेयससाठी खास गिफ्ट तयार केलं. त्याला एक स्पेशल नोट दिली ज्यात श्रेयसनं आतापर्यंत काम केलेल्या सिनेमांची नाव फार सुंदर अक्षरात लिहिली होती. श्रेयसनं फार आनंदानं हे गिफ्ट स्वीकारुन 'रविवारची सकाळी स्पेशल ठरली', असं कॅप्शन देत फोटो शेअर केलेत. तसेच त्यांनी इंडिगो विमानातील सर्व स्टाफ आणि हवाई सुंदरीचे आभारही मानले. हेही वाचा - Sundar Aamcha Ghar: काव्या दाखवणार पुरुषप्रधान संस्कृतीला इंगा! राजपाटलांच्या किचनमध्ये स्वयंपाकाचा खेळखंडोबा
  श्रेयसला दिलेल्या खास गिफ्टवर 'इक्बाल', 'गोलमाल', 'अपना सपना मनी मनी', 'ओम शांती ओम', 'हाऊसफुल 2', 'दिल दोस्ती' अशा सिनेमांच्या नावांसह 'झुकेगा नही साला!', 'कोन प्रविण तांबे?', असे श्रेयसचे सिनेमातील दमदार डायलॉगही लिहिले आहेत. त्याचप्रमाणे, 'आमचं इतकं चांगलं मनोरंजन केल्याबद्दल थँक्यू. आम्हाला तुझं काम फार आवडतं. तु आज आमच्याबरोबर प्रवास केला यासाठी आम्हाला फार छान वाटलं.  इंडिगो टिमकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा', अशी स्पेशल नोटही लिहिली आहे. श्रेयसच्या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. स्वत: इंडियोनं देखील श्रेयसच्या फोटोवर कमेंट करत, 'तुम्ही आमच्याबरोबर प्रवास करता हा आमच्यासाठी खरंच आनंदाचा प्रवास असतो. आम्ही पुन्हा तुमचं स्वागत करण्याची वाट पाहत आहोत', असं म्हटलं आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या